डॉ. गुलवाडे हॉस्पिटल ला पुरातत्व विभागाची नोटीस : चंद्रपूर किल्ला -25 मीटर च्या आत बांधकाम थांबवावे #Notice of Archaeological Department to Dr. Gulwade Hospital - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

डॉ. गुलवाडे हॉस्पिटल ला पुरातत्व विभागाची नोटीस : चंद्रपूर किल्ला -25 मीटर च्या आत बांधकाम थांबवावे #Notice of Archaeological Department to Dr. Gulwade Hospital

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


पुरातन वस्तूच्या 100 मीटर अंतराच्या कोणतेही बांधकाम करू नये यासाठी पुरातत्व विभागाने कठोर नियम बनविले आहे.काही ठिकाणी आता मात्र यात 200मीटर चीही अट घालण्यात येत असून चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी या अटीकरवी घरकुले मंजूर होऊनही बांधकाम परवानगी नसल्याने घरकुल लाभार्थ्यांना योजनेस मुकावे लागत आहे. त्याच प्रमाणे परंतु शहरातील जुना वस्ती भाग चहूबाजूनी पुरातन भिंतीकठड्यांनी वेढलेला आहे. चंद्रपूर शहर व मुख्य पेठेत दाटत्या गर्दीने जटपुरा गेट लगतच्या भिंतींजवळ उंच व पक्के बांधकाम करण्यास परवानगी नाकारली आहे. 
जटपुरा गेट कडून रामाळा तलाव कडे जाणाऱ्या पुरातन कठडा भिंतीजवळ शहरातील प्रख्यात डॉक्टर भाजपचे शहर अध्यक्ष मंगेश गुलवाडे यांना पुरातत्व विभागाने नोटीस बजावून पुरातत्व विभागाकडून बांधकाम/दुरुस्ती करण्यासंबंधी ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासंदर्भात सूचना केल्या आहे.या विषयात पुरातत्व विभाग वरिष्ठ संरक्षण सहाय्यक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण चंद्रपूर यांनी 17 सप्टेंबर 2020 ला नोटीस चंद्रपूर किल्ला परिसराच्या 25 मीटर क्षेत्रात उभ्या असलेल्या डॉ. गुलवाडे यांच्या इमारतीस नोटीस बजावली असल्याने परिसरातील इतरही अवैध बांधकाम-इमारती धारकांचे धाबे दणाणले आहेत.