कोरोना अपडेट यवतमाळ : जिल्ह्यात बरे होणा-या कोरोनाबाधितांची संख्या चार हजारांवर  24 तासात 173 जणांना सुट्टी  पाच रुग्णांचा मृत्यु ; 258 नव्याने पॉझेटिव्ह #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोना अपडेट यवतमाळ : जिल्ह्यात बरे होणा-या कोरोनाबाधितांची संख्या चार हजारांवर  24 तासात 173 जणांना सुट्टी  पाच रुग्णांचा मृत्यु ; 258 नव्याने पॉझेटिव्ह #covid-19

Share This

खबरकट्टा / यवतमाळ, दि. 13 सप्टेंबर : 


जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्युचा आकडा वाढत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत चार हजारांच्या वर कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर तसेच कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले 173 जण 'निगेटिव्ह टू पॉझेटिव्ह' झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 


तर जिल्ह्यात गत 24 तासात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 258 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. 


जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 5709 झाली आहे. डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने यापैकी तब्बल 4008 रुग्ण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 70.20 टक्के आहे. तर गत 24 तासात मृत झालेल्या पाच जणांमध्ये तीन पुरुष व दोन महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 75 वर्षीय पुरुष व 49 वर्षीय महिला, पांढरकवडा शहरातील 47 वर्षीय पुरुष, वणी शहरातील 90 वर्षीय महिला आणि दारव्हा शहरातील 24 वर्षीय पुरुष आहे. 


नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 258 जणांमध्ये 160 पुरुष व 98 महिला आहेत. यात आर्णी शहरातील 15 पुरुष व पाच महिला, आर्णी तालुक्यातील एक महिला, दारव्हा शहरातील सात पुरुष व चार महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, दिग्रस शहरातील दोन पुरुष व दोन महिला, घाटंजी शहरातील चार पुरुष व एक महिला, घाटंजी तालुक्यातील एक पुरुष, कळंब शहरातील दोन पुरुष व दोन महिला.


कळंब तालुक्यातील चार पुरुष, महागाव शहरातील 23 पुरुष व 14 महिला, महागाव तालुक्यातील एक महिला, नेर शहरातील एक पुरुष, नेर तालुक्यातील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील 15 पुरुष व चार महिला, पुसद शहरातील 20 पुरुष व 14 महिला, राळेगाव शहरातील एक पुरुष व आठ महिला.
 

उमरखेड शहरातील पाच पुरुष व दोन महिला, वणी शहरातील 20 पुरुष व 20 महिला, वणी तालुक्यातील एक पुरुष, यवतमाळ शहरातील 26 पुरुष व 14 महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष, झरी शहरातील आठ पुरुष व पाच महिला, तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणचे दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.


वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 1276 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 274 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 5709 झाली आहे. यापैकी 4008 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 150 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 293 जण भरती आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 63039 नमुने पाठविले असून यापैकी 59812 प्राप्त तर 3227 अप्राप्त आहेत. तसेच 54103 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.