कोरोना चंद्रपूर 23 सप्टेंबर : 210 नवे बाधितदोन बाधितांचा मृत्यू 4901 कोरोनातून बरे ; 3474 वर उपचार सुरू : जिल्ह्यातील बाधितांची संख्या 8499 #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोना चंद्रपूर 23 सप्टेंबर : 210 नवे बाधितदोन बाधितांचा मृत्यू 4901 कोरोनातून बरे ; 3474 वर उपचार सुरू : जिल्ह्यातील बाधितांची संख्या 8499 #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर दि. 23 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 210 नवीन बाधितांची नोंद झाली असून कोरोना बांधितांची एकूण संख्या 8 हजार 499 झाली आहे. यापैकी 4 हजार 901 बाधित बरे झाले आहेत. तर 3 हजार 474 जण उपचार घेत आहेत.
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, घुटकाळा, चंद्रपूर येथील 45 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते.
तर, दुसरा मृत्यू नेहरू नगर, चंद्रपुर येथील 34 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 17 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते. या दोन्ही मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 124 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 117, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन आणि यवतमाळ येथील तीन बाधितांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 94, पोंभूर्णा तालुक्यातील 4, बल्लारपूर तालुक्यातील 13, चिमूर तालुक्यातील 22, मूल तालुक्यातील 12, कोरपना तालुक्यातील 11, ब्रह्मपुरी तालुक्यातील 12, नागभीड तालुक्यातील 2, भद्रावती तालुक्यातील 20, सिंदेवाही तालुक्यातील 7, राजुरा तालुक्यातील 13 असे एकूण 210 बाधित पुढे आले आहे.
🔰 या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:


चंद्रपूर शहरातील हनुमान मंदिर परिसर, रामनगर, जल नगर वार्ड, दुर्गापुर, जटपुरा वॉर्ड, शिवनगर वडगाव, वृंदावन नगर, एकोरी वार्ड, बाबुपेठ, शांतीनगर, ऊर्जानगर, आयुष नगर, सरकार नगर तुकूम, समाधी वार्ड, जगन्नाथ बाबा नगर, बापट नगर, पटेल नगर, कोतवाली वार्ड, बुद्ध नगर वार्ड, पठाणपुरा वॉर्ड, सावरकर नगर, सिंधी कॉलनी परिसर, अंचलेश्वर वॉर्ड, शिवाजी चौक परिसर, विवेक नगर, भानापेठ वार्ड, गंज वार्ड, शास्त्रीनगर भागातून बाधित पुढे आले आहे.
🔰 ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:


बल्लारपूर तालुक्यातील बामणी, महादवाडी, नागाळा, रेल्वे वार्ड, टिळक वार्ड, फालसिंग नाईक वार्ड, संतोषीमाता वार्ड, परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील रामपूर,पेठ वार्ड, विरूर रोड,परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
भद्रावती तालुक्यातील गुरु नगर, संताजी नगर, राम कृष्णा चौक परिसर, शिवाजी वार्ड, गणपती वार्ड, गांधी चौक परिसर, आंबेडकर वार्ड, गौराळा, माजरी, झाडे प्लॉट परिसरातून बाधीत ठरले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर, माणिकगड कॉलनी परिसर, आवारपूर, सुभाष नगर, भागातून बाधीत पुढे आले आहे.
चिमूर तालुक्यातील नेहरू वार्ड, गांधी वार्ड, टिळक वार्ड, माणिक नगर, वडाळा पैकु, शंकरपुर, नेताजी वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
मूल तालुक्यातील लक्ष्मीनारायण राईस मिल परिसर, वार्ड नं. 16 परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील गजानन नगरी, गांधिनगर, रमाबाई चौक परिसर, शेष नगर, रुक्मिणी नगर,खेड, लुंबिनी नगर,कुर्झा भागातून बाधित पुढे आले.