धक्कादायक : चंद्रपुरातील 20 खाजगी डॉक्टर कोरोना बाधित : सरकारी फुल्ल :खाजगी डॉक्टर बाधित - रुग्णांवर उपचार करणार तरी कोण? #20 private doctors in Chandrapur infected Corona - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धक्कादायक : चंद्रपुरातील 20 खाजगी डॉक्टर कोरोना बाधित : सरकारी फुल्ल :खाजगी डॉक्टर बाधित - रुग्णांवर उपचार करणार तरी कोण? #20 private doctors in Chandrapur infected Corona

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने रौद्र रुप धारण केले सर्व असून आज 13 सप्टेंबर च्या आकडेवारी नुसार जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 5858 झाली आहे.


त्याचसोबत जिल्ह्यात सर्वत्र डेंग्यू, मलेरिया, टॉयफाइड, चिकन गुनिया ने थैमान घातले आहे. सद्या सर्वत्र 100 पैकी 40 व्यक्तींचे कोणत्या ना कोणत्या कारणाने बिमारीचे प्रमाण आहे. 


शिवाय कोरोनानेही सर्वच वयोगटातील नागरिकांना आपल्या कवेत घेण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व सरकारी दवाखाने, कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांना बेड मिळविण्यासाठी 12-15 तास वेटिंग वर राहावे लागत आहे. 


त्यातल्या त्यातकोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी चंद्रपूर शहरातील अनेक खाजगी रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. 


त्यात रुग्णांची संख्या वाढत असतांना यात सेवा देणाऱ्या 20 डॉक्टरांनाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अश्या रुग्णांवर उपचार करणार तरी कोण?