खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी -
तालुक्यातील रानबोथली ग्रामपंचायतमध्ये दिवाबत्ती पाणीपुरवठा कर्मचारी पदावर रुजू होण्यासाठी आदेश देण्याकरिता 20 लाख 20 हजार रुपयांची लाचमागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
मिलिंदनीलकंठ खरकाटे (38) असेलाचखोर सरपंचांचे नावअसून 2 लाख 20 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने त्यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलाआहे.
तक्रारदाराणे दिवाबत्ती व पाणीपुरवठा कर्मचारी पदाकरिता ग्रामपंचायत येथे अर्ज केला होता. 24 ऑगस्टच्या ग्रामपंचायत सभेतठराव पारीत करून तक्रारदाराची नियुक्ती करण्यात आली. मात्र नियुक्ती आदेश देण्याकरिता सरपंच मिलिंद खरकाटे याने तक्रारदाराकडे 2 लाख 20 हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रार दाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर कडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून सरपंच मिलिंद नीलकंठ खरकाटे यास रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलीस निरीक्षक सुरडकर यांनी अत्यंत गोपनीयरीत्या सापळा रचत कारवाई केली.2 लाख 20 हजार रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.