जिल्ह्यातील झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना विषाणूचा उद्रेक बघता जिल्ह्यात पुन्हा जनता कर्फ्यु लावण्यात यावा यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन 18 सप्टेंबरला करण्यात आले आहे.
ही बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
कांग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस, मनसे, बसपा, चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांना सदर बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
आधीच वाढत्या रुग्ण संख्येने आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडलेली आहे, त्याच नियोजन न करता जनता कर्फ्यु लावणे कितपत योग्य आहे? सध्या नागरिकांना कोरोनाची भीती नसून हॉस्पिटलची भीती वाटत आहे.
कोविड केअर सेंटरमध्ये सतत रुग्ण दगावत असल्याने नागरिकांनी आता सरळ प्रशासनावर गंभीर आरोप लावण्यास सुरुवात केली आहे.
प्रशासनाचे नियोजन हे शून्य आहे वाढत्या रुग्णसंख्येवर त्यांचं नियंत्रण काहीच नाही म्हणून आता जनता कर्फ्यु खरंच हे योग्य आहे का?