कोरोना मुक्त - कैद्यांची कोरोनातून सुटका : चंद्रपूर जिल्हा कारागृहातील सर्व 170 बंदी व 20 कर्मचारी कोरोना मुक्त : जिल्हा कारागृह कोविड केयर सेंटर चे नोडल ऑफिसर डॉ. अमित डांगेवार यांचे उल्लेखनीय सेवा कार्य #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोना मुक्त - कैद्यांची कोरोनातून सुटका : चंद्रपूर जिल्हा कारागृहातील सर्व 170 बंदी व 20 कर्मचारी कोरोना मुक्त : जिल्हा कारागृह कोविड केयर सेंटर चे नोडल ऑफिसर डॉ. अमित डांगेवार यांचे उल्लेखनीय सेवा कार्य #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चंद्रपूर जिल्हा कारागृहात दाखल सर्वं 170 बंदी बांधव व करोना बाधित आढळलेले 20 अधिकारी कर्मचारी करोना मुक्त झाल्याचे व सध्या सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा जिल्हा कारागृह चंद्रपूर कोविड केअर सेंटर चे नोडल ऑफिसर डॉ अमित डांगेवार यांनी कळविले आहे.चंद्रपूर जिल्हा कारागृहातील 170 बंदी व 20 कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले होते. तदनंतर लगेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निवृत्ती राठोड यांनी तातडीने जिल्हा कारागृहात भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला व सदर बंदी बांधवांसाठी कारागृहातच व बाधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन कर्मचारी वसाहती मध्ये कोविड केअर सेंटर स्थापन करण्याचा लगेच सूचना दिल्या.याचे पालन करत कारागृह अधीक्षक श्री वैभव आगे यांचे मार्गदर्शनात कारागृहातच कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निवृत्ती राठोड यांचे आदेशानुसार कारागृहात संपूर्ण वैद्यकीय चमू यांनी जिल्हा कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा कारागृह कोविड केअर सेंटर चे नोडल ऑफिसर डॉ अमित डांगेवार यांचे नेतृत्वाखाली सर्व आजारी बंदी व कर्मचारी यांची उत्तम प्रकारे वैद्यकीय सेवा केली.
सदर कालावधीत कुठल्याच बनद्याला व कारागृहातील बाधित कर्मचाऱ्याला कसलीही वैद्यकीय अडचण उद्भवली नाही.सर्व बंद्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांचा 10 दिवसांचा विलगिकरणाचा व सोबत 7 दिवसांचा अतिरिक्त कालावधी सुद्धा पूर्ण केलेला असून सर्व अधिकारी व कर्मचारी परत कर्तव्यावर रुजू झाले आहे व सध्या सर्वांची प्रकृती उत्तम आहे.
सदर जिल्हा कारागृहातील कोविड केअर सेंटर उत्तम प्रकारे कार्यरत ठेवणासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निवृत्ती राठोड सर, कारागृह अधीक्षक श्री वैभव आगे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी वैभव आत्राम ,श्री रवींद्र जगताप तसेंच संपूर्ण कारागृह प्रशासन यांचे उत्तम प्रकारे सहकार्य लाभले असे चंद्रपूर जिल्हा कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा जिल्हा कारागृह कोविड केयर सेंटर चे नोडल ऑफिसर डॉ अमित डांगेवार यांनी कळविले आहे.