आज 152 नवे बाधित : चंद्रपूर कोरोना एकूण 4055 #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आज 152 नवे बाधित : चंद्रपूर कोरोना एकूण 4055 #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर,7 सप्टेंबर :

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 4055 झाली आहे. गेल्या 24 तासात 152 नवीन बाधित पुढे आले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 2049 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.


कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 1958 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 2049 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. 


चंद्रपूर जिल्ह्यातील 44 सह एकूण 48 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान ही वाढती रुग्णसंख्या पाहता सर्वांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे , सुरक्षा बाळगावी आणि आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.