जिल्ह्यात कोरोनाने कहर करणे सुरू केले आहे. प्रत्येक ठिकाणी कोरोना शिरकाव करीत आहे. जिल्हा कारागृहात यापूर्वी 71 कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती.
कारागृहात कोरोना विषाणू गेलाच कसा, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असतानाच पुन्हा कैदीबांधव कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे. आता कारागृहातील एकूण 150 कैदी व 30 कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याने कारागृह प्रशासन चांगलेच हादरले आहे.
🔰 कारागृहातच कोविड केअर सेंटर
जिल्हा कारागृहातील तब्बल 150 कैदी कोरोनाबाधित झाल्यामुळे चंद्रपुरातील जिल्हा कारागृहातच कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे. आरोग्य विभागाचे पथक या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे.
नवीन कैदी बांधवांना बाधा होऊ नये म्हणून तुकूम येथील एका आयटीआयमध्ये तात्पुरते करागृह केले आहे.