शेतकऱ्यांच्या पशुधनाची लंपी रोगापासून सर्वतोपरी काळजी घ्या:-कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे कोरपना तालुक्यातील एकाच दिवशी 12 गावात लंपी रोगाच्या उपाययोजनेचा मॅराथान आढावा #lampi - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकऱ्यांच्या पशुधनाची लंपी रोगापासून सर्वतोपरी काळजी घ्या:-कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे कोरपना तालुक्यातील एकाच दिवशी 12 गावात लंपी रोगाच्या उपाययोजनेचा मॅराथान आढावा #lampi

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

कोरपना तालुक्यातील 12 गावात लंपी रोगाच्या उपाययोजनेचा आढावा जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील ऊरकुडे यांनी घेतला.शेतकऱ्यांवर लंपी रोगाचे संकट आले असून त्यामुळे शेतकरी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


ऐन शेतीच्या हंगामाच्या दिवसात हे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले असून पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र काम या रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी करत आहे,तरी शेतकऱ्यांच्या पशुधनाची सर्वतोपरी काळजी घ्या असे निर्देश जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील ऊरकुडे यांनी अधिकाऱ्यांना दिले यावेळी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने,तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.कळमकर,तालुका कृषी अधिकारी दुधे उपस्थित होते.


लंपी हा रोग लागवटीचा रोग असून आपण पशुधनाला एकमेकांपासून दूर ठेवले पाहिजे तसेच गोठयची सुद्धा योग्यप्रकारे निर्जंतुकीकरण केले पाहिजे,तसेच प्रत्येक पशुधनला लसीकरण पशुपालकांनी अवश्य करावे तसेच आपल्याला काही लंपी रोगाची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आव्हान पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले.


तसेच जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या शासकीय योजनांची माहिती यावेळी सर्व गावातील शेतकऱ्यांना देण्यात आली.तसेच लाभार्त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज सादर करून विविध प्रकारच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.


यावेळी कोरपना तालुक्यातील भारोसा,भोयगाव,सांगोडा,अंतरगाव (बु),नारंडा,पिपरी, शेरज(खुर्द),शेरज(बु),हेटी, कोडशी (खुर्द),गांधीनगर, तुळशी इत्यादी गावांना भेटी देऊन सदर गावात राबविण्यात येणाऱ्या लंपी रोगाच्या उपाययोजनेबाबत आढावा घेण्यात आला तसेच शेतकऱ्यांना अनेक समस्यांचे निराकरण यावेळी करणयात आले.यावेळी 12 गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.