गेल्या अनेक महिन्यांपासून रामपूर येथील जुन्या वसाहतीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष होण्याच्या तक्रारी वाढत आहेत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे नवीन वस्तीकडे ग्रामपंचायतीचे लक्ष आहे परंतु जुन्यावसा दिन कडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे.
वारंवार ग्रामपंचायतीकडे तथा वॉर्ड मेंबर यांच्याकडे पाठपुरावा करून देखील रस्त्याचे अवस्था ही जशास तशी आहे रस्ता दुरुस्तीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून मागणी करून देखील होत नसल्याचे पाहून रामपुर वासियांनी सुरज ठाकरे यांना संपर्क केला.
सुरज ठाकरे हेदेखील लवकरच रामपुर वासी होणार असल्याने त्यांनी देखील त्यांची व्यथा ऐकून घेतली व ग्रामपंचायतीशी संपर्क करून सोमवारपर्यंत जर या खराब रस्त्याने बाबत निर्णय लागला नाही तर मी स्वखर्चाने हा खराब रस्ता ठीक करून देईल असे वचन रामपूर वासियांना दिले त्यामुळे रामपूर वास यांनीदेखील त्यांचे आभार मानले व त्यांच्या तात्काळ निर्णय देण्याच्या शैली बाबत आनंद व्यक्त केला.