‘नाडी ऑक्सीमिटर’ खरेदी करणार जिल्हापरिषद -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रूग्णांची तात्काळ मिळेल माहिती : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची बदली रद्द करण्याकरिता स्थायी समितीत ठराव मंजूर #zpchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

‘नाडी ऑक्सीमिटर’ खरेदी करणार जिल्हापरिषद -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रूग्णांची तात्काळ मिळेल माहिती : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची बदली रद्द करण्याकरिता स्थायी समितीत ठराव मंजूर #zpchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ‘पल्स ऑक्सीमिटर’ (नाडी) तपासणी यंत्र खरेदी करण्याचा महत्वपूर्ण ठराव जिल्हा परिषदेच्या सभागृहात बुधवार, 12 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. 

या तपासणी यंत्रामुळे नागरिकांच्या शरीरातील ऑक्सीजन, त्या व्यक्तींला कोरोनाची लक्षणे आहेत किंवा नाही, याबाबतची माहिती तात्काळ आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे. त्यामुळे हा मिटर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली.

नाडी तपासणी यंत्र ग्रामपंचायत स्तरावर आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मलेरिया कर्मचारी यांना दिला जाणार आहे. या यंत्राची खरेदी जिल्ह्यातील ग्राम पंचायत स्तरावर केली जाणार आहे. लवकरच खरेदी प्रक्रियेची ई-निविदा काढली जाणार असल्याचेही डॉ. गहलोत म्हणाले. 

दरम्यान, कोरोनाच्या सावटात कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची बदली करण्यात आली. ही बदली रद्द करण्यात यावी, असा ठराव स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. कोरोना काळात उत्तमरित्या काम केल्याबद्दल डॉ. खेमनार यांच्या अभिनंदनाचा ठराव या सभेत घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांनी दिली.

ग्रामीण भागातील शाळांमध्ये असलेले दाखल खारिज उतार्‍यांचे नुतनीकरण व संगणकीकरण करण्याचा ठराव पारित करण्यात आला. प्रादेशिक व स्वतंत्र्य पाणी पुरवठा योजनांवर सभेत गदारोळ झाला. जिल्हा परिषदेतील काही वाहने जुनी झाली आहेत. नवी वाहने खरेदी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यासह अन्य विषयांवर स्थायी समितीच्या सभेत चर्चा झाली.