व्याघ्र हल्ला : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार #wild attack - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

व्याघ्र हल्ला : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार #wild attack

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी :- 

ब्रम्हपुरी येथून जवळच असलेल्या मेंडकी पंचायत समिती गणामधिल मौजा- परसोडी(शिवसागर तुकुम) ता.ब्रम्हपुरी येथेही घटना घडली . श्री अन्नाजी नारायण कुथे वय वर्ष ४८ हे स्वत;चे गुरे जंगलात चरावयास नेहमी प्रमाणे गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला केला त्यात ते जागीच मरण पावले.

सदर घटना 8 ऑगस्ट ला दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान घडली असावी असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. अन्नजी कुथे यांचा दुधा चा व्यावसाय असून ते स्वतः ची गुरे स्वतः च चायरायला घेऊन जायचे. अन्नाजी कुथे यांना 4 मुली असून 2 मुलींची लग्न झाली आहेत.

अन्नाजी हे घरचे एकमेव कर्ते पुरुष होते त्यांच्या पश्चात 2 मुली व पत्नी आहे.अन्नजी कुथे यांचा दुधा चा व्यावसाय असून ते स्वतः ची गुरे स्वतः च चायरायला घेऊन जायचे. त्यांना अतिक्रमण ची दिड एकर शेत जमीन असून त्यावर व दुधाच्या विक्रीवर त्यांचा उदर निर्वाह चालायचा. घरचा कर्ता व्यक्ती गेल्याने परसोडी गावात शोककळा पसरली आहे पुढील तपास मेंडकी येथील पोलीस करीत आहेत.