विदर्भ ब्रेकिंग :धारदार शस्त्राने ढाबा मालकाची निर्घृण हत्या #Vidarbha Breaking: Brutal murder of Dhaba owner with a sharp weapon - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विदर्भ ब्रेकिंग :धारदार शस्त्राने ढाबा मालकाची निर्घृण हत्या #Vidarbha Breaking: Brutal murder of Dhaba owner with a sharp weapon

Share This
खबरकट्टा / विदर्भ : 

नागपूर – हिंगणा येथील आउटर रिंगरोडवर एका ढाबा मालकाची धारदार शस्त्राने हत्या करण्याची बाब पुढे आली.हत्याचा घटनेची माहिती मिळताच परिसरातील खळबळ उडाली.पोलीसांन कडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.अधिक माहितीनुसार  काल 31 जुलै, रात्री आउटर रिंगरोड स्थित तंदूर ढाब्याचे मालक प्रविन सातपुतेची हत्या करण्यात आली.हत्येचा घटनेबद्दल सकाळी पोलीसांना माहिती मिळाली.माहिती मीळताच पोलीस घटनेचा ठिकाणी दाखल झाली व घटनेची चौकशी सूरु केली.

पोलीसांनी ढाब्यावर काम करणाऱ्या नौकरावर संशय व्यक्त केला आहे.हत्या नंतर नौकर पसार झाला आहे.आता पोलीस त्यानौकराचा शोधात आहे.या घटनेचा संबंधित पोलीस निरीक्षक दूर्गे यांच्या दिलेल्या माहितीनुसार पोलीस घटनेच्या तपासामागे लागली आहे.


लवकरच आरोपीला जेरबंद करण्यात येईल अशी माहिती दिली.हत्या नंतर नौकर पसार झाल्यामुळे त्याचावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.त्याचा अटकेनंतर हत्ये बाबत खरा खूलासा होईल.


लॉकडाउन असल्यामुळे ढाबा बंद होता, परंतु अनलॉक नंतर ढाब्याचा मालक सातपूतेनी पार्सल सूविधा‌ सूरु केली.नेहमीप्रमाने रात्री नौकरांनसोबत प्रविन सातपुते सूध्दा ढाब्यावर हजर होता.परंतू नौकरासोबत प्रविन कुठल्यातरी कारणावरून बाचाबाची झाली.या कारणावरून हत्या घडल्याची संभावना व्यक्त करण्यात येत आहे.आरोपीला अटक केल्यानंतरच संपूर्ण घटनेची खरी माहिती मीळण्याची शक्यता‌ आहे.