शहरात तलवार घेऊन फिरणाऱ्या दोन युवकांना अटक #Two youths carrying swords arrested in the city - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शहरात तलवार घेऊन फिरणाऱ्या दोन युवकांना अटक #Two youths carrying swords arrested in the city

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

तलवार घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना रामनगर पोलीसांनी काल दिनांक 2/8/20 रोजी अटक केली आहे. पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संजय नगर एम ई एल कंपनी रोड चंद्रपूर परीसरात येथे एक इसम हातात तलवार घेऊन फिरत होते. 

अशा माहितीवरून संजय नगर स्नेह मंच समोर रोड चंद्रपूर येथे पेट्रोलिंग दरम्यान आरोपी नामे बरकत सिंग दारासिंग डांगी वय 30 वर्ष रा. इंदिरानगर चंद्रपुर व मुन्ना रामू जाधव वय 19 वर्ष राहणार संजय नगर चंद्रपुर हे आपले ताब्यातील सुपर स्प्लेंडर मो.सा.क्र.एम एच ३४ए डि 2178 या मोटरसायकलवर बसून हातात बेकायदेशीररीत्या तलवार घेऊन फिरत असता मिळून आले त्यांचे ताब्यातून व अंगझडतीत खालीलप्रमाणे मुद़देमाल बेकायदेशीररीत्या बाळगुन मिळुन आल्याने अप क्र.736 /2020 कलम 4,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

नग तलवार किं अं 3000/-रू.गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल किं अं 35, 000/-रू.नग मोबाईल संच कि.अं 5000रू. नगदी रक्कम 11,240रू असा एकुण ,54,240/-रू चा मुद़देमाल हस्तगत करण्यात आला.ही कारवाई पोलीस निरीक्षक हाके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभुदास माहुलीकर, संतोष दरेकर,गजानन डोईफोडे शंकर येरमे, रामभाऊ राठोड,पोशी माजीद खा पठाण,पोशी निलेश मुडे यांनी केली आहे.