🐯 ग्रामसेवक वाघनख सुवर्णकारकडे घेऊन गेला अन थेट कोठडीत पोहोचला :वाघ नखा पासून लॉकॆट बनविण्यासाठी गेलेले ग्रामसेवक संजय कुंटावार वन विभागाच्या जाळ्यात #Tiger claw - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

🐯 ग्रामसेवक वाघनख सुवर्णकारकडे घेऊन गेला अन थेट कोठडीत पोहोचला :वाघ नखा पासून लॉकॆट बनविण्यासाठी गेलेले ग्रामसेवक संजय कुंटावार वन विभागाच्या जाळ्यात #Tiger claw

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : मुल -

आपल्या मुलाला करीता वाघ नखापासुन गळ्यात लॉकॆट बनविण्यासाठी येथील एका सुवर्णकाराकडे आलेला ग्रामसेवक संजय माधव कुंटावार याला वन अधिका-यांनी अटक केली. तो गडचिरोली पंचायत समिती मध्ये कार्यरत आह.े न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडीत सुनावणी केल्या नंतर त्याची बुधवारी जामिनावर सुटका केली या वाघा चा तस्करिचे धागेदोरे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील असल्याने वनविभाग त्या दिशेने चैकशी सुरु केली आहे.

संजय कुंटावार याचे मूल शहरात वास्तव्य आहे. 2005 मध्ये तो गडचिरोली जिल्ह्यातील बीनागुंड येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत होते. त्यावेळी त्याने एकाला घरकुलाचे आमिश देत एका व्यक्तीकडून वाघनखे मिळवली. सोमवारी वाघनखापासून लॉकॆट बनविण्यासाठी तो मुल येथील कृष्णाकांत विट्ठल कत्रोजवार या सुवर्णकाराचा दुकानात गेले असता एका वन्यजीव प्रेमिला त्या बाबत माहिती मिळाली.

त्याने लगेच वन विभागाला कळविले वनपाल खनके व वनरक्षक मरसकोल्हे यांनी लगेच ग्रामसेवक कुंटावार याला ताब्यात घेवून वनपरिक्षेत्र कार्यालय चिचपल्ली येथे अधिक चौकशी करिता नेले. त्याने वाघ नखाचा तस्करिचि माहिति दिली असता वन विभागने वनकायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास विभागीय वन अधिकारी श्री. अशोक सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वन संरक्षक एस. एल. लखमावार आणि वन परीक्षेत्र अधिकारी चिचपल्ली वैभव राजुरकर करीत आहेत.