ब्रेकिंग चंद्रपूर: वाघ नख विक्री... !!करिता ग्राहक शोधणारे पोलिसांच्या ताब्यात#Tiger claw arrested at chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग चंद्रपूर: वाघ नख विक्री... !!करिता ग्राहक शोधणारे पोलिसांच्या ताब्यात#Tiger claw arrested at chandrapur

Share This


खबरकट्टा / चंद्रपूर : 
शहरातील गुरु नगर परिसरात वाघाचे नख विक्रीकरिता आणण्यात आले असून ते विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्याआधारे सापळा रचून दोन आरोपी सह एक वाघ नख ताब्यात घेतले ही कारवाई शनिवारला करण्यात आली. 

यातील प्रशांत बालाजी बावणे वय 26 वर्ष राहणार मुधोली, विकास ऋषी बावणे वय 22 वर्ष राहणार गुरुनगर असे आरोपीचे नावे असून हे शनिवारला शहरातील गुरु नगर परिसरात वाघाचे नख विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून एक वाघ नखा सह दोन आरोपींना ताब्यात घेतले.

ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, सचिन गुरनुले, हेमराज प्रधान, केशव चिटगिरे, निकेश ढेंगे यांनी केली हे प्रकरण वन विभागाशी संलग्न असल्याने त्या आरोपींना वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. 

वनपरिक्षेत्र अधिकारी भद्राव तीस्वाती म्हैसकर यांनीं वाघ नखासह दोन आरोपींना वनविभागाच्या ताब्यात घेतले. सदर प्रकरण हे गेल्या काही दिवसापूर्वी ताडोबा बफर झोन येथील प्रकरणातील वाघाच्या मिशा व वाघ नखा सह काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते त्यातीलच हे अन्य आरोपी असून पुढील तपास करण्यात येणार आहे.