चांदाफोर्ट जाणाऱ्या मालगाडीच्या खाली येऊन इसमाची आत्महत्या #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चांदाफोर्ट जाणाऱ्या मालगाडीच्या खाली येऊन इसमाची आत्महत्या #suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


चंद्रपूर येथे बल्लारशा मार्गे चांदफोर्ट रेल्वे मार्गावर जात असलेल्या मालगाडीच्या खाली येऊन इसमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.मोतीराम दुर्गम असे ६० वर्षीय मृतकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मोतीराम हा काही दिवसापासून आपले मानसिक संतुलन हिरावून बसला होता.अशातच त्याने आज बाबुपेठ रेल्वे स्टेशन च्या रेल्वे लाईन वरून जाणाऱ्या माल गाडीच्या खाली येऊन त्याने आत्महत्या केली.या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून शव ताब्यात घेतले.पुढील तपास सुरु आहे.