दहावीमध्ये कमी गुण मिळाल्याने आत्महत्या : चंद्रपूर जिल्ह्यात विद्यार्थ्याने घेतला गळफास #Suicide due to low marks in class X: Student strangled in Chandrapur district - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दहावीमध्ये कमी गुण मिळाल्याने आत्महत्या : चंद्रपूर जिल्ह्यात विद्यार्थ्याने घेतला गळफास #Suicide due to low marks in class X: Student strangled in Chandrapur district

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सिंदेवाही -

दहावीच्या निकालात आपल्याला इतरांपेक्षा कमी गुण मिळाले, या नैराश्येपोटी येथील एका विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास घडली. 

नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात आपल्याला इतरांपेक्षा कमी गुण मिळाले, या नैराश्येपोटी येथील एका विद्यार्थ्याने  राहत्या घरी गळफास घेऊन 
रोहित रामदास राकडे (16), राहणार नवरगाव तालुका सिंदेवाही असे मृतकाचे नाव आहे.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहितला दहावीमध्ये ४४ टक्के गुण मिळाले आणि तो पास झाला. मात्र इतरांपेक्षा कमी गुण मिळाल्याने तो अस्वस्थ होता.

दरम्यान, शुक्रवारी घरच्या सदस्य शेतावर गेल्यानंतर सायंकाळी 4 वाजता त्याने घरातच धाब्यावर चढून दोरीच्या साहाय्याने गळफास लावून केली. सायंकाळी घरची मंडळी शेतावरून आली. मात्र मित्रांबरोबर नेहमीप्रमाणे रोहित बाहेर गेला असावा, असे समजून सर्वांनी जेवण आटोपले. त्यानंतर वडील झोपण्यासाठी वरच्या खोलीमध्ये गेले, तेव्हा रोहित गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे.