सोलर बिघडले....शेतकरी संतापले विद्यूत कार्यालयावर दिली धडक...अन्यथा आंदोलनाचा इशारा #solar pumps - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सोलर बिघडले....शेतकरी संतापले विद्यूत कार्यालयावर दिली धडक...अन्यथा आंदोलनाचा इशारा #solar pumps

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी -

शेतात पाण्याची व इतर सुविधेसाठी शेतक-यांनी विद्यूत वितरण कंपनीच्या माध्यमातून सिआरआय कंपनीचे सोलर घेतले.पण काही दिवसातच ते बिघडले.कंपनीने सोरलची गॅरन्टी दिली.पण प्रत्यक्षात मात्र ते दुरूस्त करून देण्यास तयार नव्हते.वर्ष लोटूनही कार्यवाही होत नसल्याचे बघून आज शेतक-यांनी युवा कार्यकर्ता मनीष वासमवारंांची भेट घेत विद्यूत कार्यालयावर धडक दिली.येत्या दहा दिवसात सोलर दुरूस्त करून न दिल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतक-यांनी दिला.

गोंडपिपरी तालुक्यात मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजनेतून मोठया प्रमाणावर शेतक-यांनी सोलर खरेदी केली.विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून सिआरआय या कंपनीचे हे सोलर होते.सोलर घेतावेळी कंपनीने गॅरन्टी दिली होती.व बिघाड आल्यास तात्काळ दुरूस्ती करून देण्याचे सांगीतले होते.सोलर घेतल्यानंतर अगदी काही काळात सोलरमध्ये बिघाड आला.यासाठी शेतकरी बांधवाचे विद्यृत वितरण कंपनीकडे हेलपाटे सुरू होते.सध्या रोवण्याची सिझन संपली असून धानाला पाणी करण्याची वेळ आहे.


अशास्थितीत आपण पैेसे खर्च करून घेतलेला सोलर आठ महिन्यापासून खराब अवस्थेत पडून आहे.हे बघून शेतकरी संतापले.तोहोगाव येथील बाबुराव बोंडे,संतोष अलगमकार,नामदेव चैधरी,शिबु चैधरी,शंकर येलमुले,गुणवंत बोबडे या शेतक-यांनी युवा कार्यकर्ता मनीष वासमवार यांची भेट घेतली.त्यांना प्रकरणाची माहिती दिल्यांनतर वासमवार यांनी शेतक-यांना सोबत घेत विद्युत वितरण कार्यालयावर धडक दिली.आठ महिन्यापासून हा प्रकार सुरू असतांना विभाग काय करतोय असा जाब त्यांनी विचारला.


तसेच येत्या दहा दिवसात याप्रकरणी तोडगा न निघाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.गोंडपिपरी तालुक्यातील प्रशासन पुरते ढिम्म झाले आहे.आमदार सुभाष धोटे यांचे अधिका-यांवर नियंत्रण नसल्याने अधिका-यात कमालीचा निरूत्साह असल्याचे एकंदरित चित्र आहे यातूनच विविध समस्या अधिकच बिकट होत आहेत. 


येत्या दहा दिवसात सोलर दुरूस्ती करून दिले नाही तर शेतकरी बांधव आदोंलन करतील असा इशारा आम्ही विद्यूत वितरण कंपनीला दिला आहे.याप्रकरणी तातडीन मार्ग काढावा अशी आमची मागणी आहे. -मनीष वासमवार, गोंडपिपरी