चंद्रपूर येथे उद्योजकांसाठी स्मार्ट स्किल वेबिनार #smart skill webinar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर येथे उद्योजकांसाठी स्मार्ट स्किल वेबिनार #smart skill webinar

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर,दि. 20ऑगस्ट:  

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूरद्वारे 10 पास व 18 वर्षे पूर्ण झाले असलेल्या युवक-युवतींना 21 ऑगस्ट रोजी एक दिवसीय कालावधीचे ऑनलाईन उद्योजकांसाठी सॉफ्ट स्किल कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. 

       

सदर कार्यशाळेत संवादाचे महत्त्व, निर्णय घेण्याची कौशल्य, सादरीकरण कौशल्य, कार्य संघाचे महत्व, वेळेचे व्यवस्थापन, उद्योग उभारणी करिता प्रक्रिया इत्यादी विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


सदर प्रशिक्षणात ऑनलाइन प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी त्वरित दिनांक 20 ऑगस्ट 2020 पर्यंत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही.राठोड मो.नं.9403078773, 07172-274416 व कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे मो.नं. 9011667717 यांच्याशी संपर्क साधावा.