उदापुर येथील सरपंच यांचा ट्रॅक्टर अवैध वाळू तस्करी करतांना जप्त* :- बोंडेगाव येथील नदी पात्रातून होत होती अवैध वाळुची तस्करी.... :- महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पहाटेच्या सुमारास कारवाई..... :- लोकप्रतिनिधीच झाले आहे आता तस्कर #sand trafficking - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

उदापुर येथील सरपंच यांचा ट्रॅक्टर अवैध वाळू तस्करी करतांना जप्त* :- बोंडेगाव येथील नदी पात्रातून होत होती अवैध वाळुची तस्करी.... :- महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पहाटेच्या सुमारास कारवाई..... :- लोकप्रतिनिधीच झाले आहे आता तस्कर #sand trafficking

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रह्मपुरी:-  

ब्रह्मपुरी तालुक्यातील बोंडेगाव नदी पात्रातून अनेक दिवसांपासून अवैध वाळू तस्करी होत होती. वाळु तस्करी अनेक दिवसांपासून अवैध रित्या वाहतूक होत आहे.शासनाच्या तिजोरीत लाखोंच्या रुपयांचा महसूल बुडवून अवैध वाळू तस्करी करतांना दिसत आहे.


दिनांक ३१ तारखेला  सकाळच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक होत असताना  MH-34,BC 2219 आयसर कंपनी च्या ट्रॅक्टर वाळू भरून  जात असताना त्यावर कारवाई करण्यात आली.


ट्रॅक्टरचे मालक रिंकु नाकतोडे हे उदापुर येथील प्रभारी सरपंच आहेत.महसुल विभागाच्या या कारवाई मुळे  बोंडेगाव येथील अवैध वाळू तस्करी करणाऱ्या चे भिती निर्माण झाली आहे.या कारवाईत उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी क्रांती डोंबे यांनी अवैध वाळू वाहतूक कायदा अर्तंगत १ लाख रुपये १० हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.