उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी ट्रॅव्हल चे काम करणारे राहुल तायडे यांच्याविरोधात खंडणी मागीतल्याचा असल्याचा आरोप केला असुन तायडे विरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात आज सायंकाळी तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर माहिती नुसार आरोपी राहुल तायडे शिंदे ह्यांना मागील 1 वर्षापासून सतत त्रास देत होते. तसेच वारंवार पैशाची मागणी करीत असुन पैसे दिले नाही तर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राहुल तायडे यांनी काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी कांग्रेस चे शहर अध्यक्ष राजीव कक्कड़ यांच्यासोबत अधिकारी विश्वंभर शिंदे यांच्याविरोधात घेण्यात आलेल्या प्रेस वार्ता मधे उपस्थिती होती. प्रेस वार्ता नंतर तायडे वारंवार खंडणी मगित आहेत अशी तक्रार रामनगर पोलीस स्टेशन ला करण्यात आली.
राहुल तायडे विरुद्ध कलम 385,501(भा. द वी ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. आज दुपारी 12 वाजेपासुन तायडे यांची विचारपूस करण्यात आलेली आहे.या नंतर संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास रामनगर पोलिसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लाकडे करित आहेत.