दुचाकीची मिनी ट्रक ला धडक : चालक ठार, दुसरा जखमी : आज सकाळची घटना #road accident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दुचाकीची मिनी ट्रक ला धडक : चालक ठार, दुसरा जखमी : आज सकाळची घटना #road accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी -

ब्रम्हपुरी तालुक्यातील अऱ्हेनवरगांव जवळ आज 3 ऑगस्ट सकाळी ट्रक -दुचाकीचा अपघात  झाला. त्यात सौरभ लालाजी पिलारे (20) भालेश्वर  जागीच मृत्यू झाला. तर रंजित बुल्ले भालेश्वर (22)जखमी आहे. 

ब्रम्हपुरी वरून गाडी क्र. एम एच 29 टी 936  हा मिनी ट्रक  अर्हेर नवरगाव येथील माँ तुळजाभवानी राईस मिल मध्ये तांदूळ सालटेक्स करण्यासाठी येत असताना अर्हेर नवरगाव वरून भरधाव वेगाने येत असलेल्या दुचाकी एमएच 34 बीजे 1376 ने ब्रम्हपुरी वरून येत असलेल्या ट्रक ला धडक दिल्याने उपचारास नेत असतांना दुचाकी स्वाराचे निधन झाले.

अधिक तपास पो.नि.बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात कॉन्स्टेबल गौरकर ,कॉन्स्टेबल इंगोले करीत आहेत