नेफडो शाखा -राजुरा च्या तालुकाध्यक्षपदी बादल बेले तर महिला अध्यक्षा अल्का सदावर्ते यांची निवड. - उपाध्यक्षपदी दिलीप सदावर्ते ,रजनी शर्मा तर सचिवपदी अँड. मेघा धोटे , सुजीत पोलेवार यांची सर्वानुमते निवड.#rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नेफडो शाखा -राजुरा च्या तालुकाध्यक्षपदी बादल बेले तर महिला अध्यक्षा अल्का सदावर्ते यांची निवड. - उपाध्यक्षपदी दिलीप सदावर्ते ,रजनी शर्मा तर सचिवपदी अँड. मेघा धोटे , सुजीत पोलेवार यांची सर्वानुमते निवड.#rajura

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची नुकतीच राजुरा शाखा तालुका राजुरा ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.


यावेळी तेजस्विनी श्रीरंगराव नागोसे नागपूर विभाग ,उपाध्यक्षा श्रीरंगराव गोविंदा नागोसे जिल्हा संघटक , ललिता मुस्कावार जिल्हाअध्यक्ष,रत्ना गुरूदास चौधरी जिल्हा सचिव, कविता मोहूर्ले जील्हा संघटक यांची प्रमुख उपस्थिति होती.  सर्व सदस्य व पदाधिकारि यांच्या उपस्थितीत राजुरा तालुका कार्यकारणीची अधिक्रुतपणे नियुक्ति करण्यात आली. 


राजुरा तालुका अध्यक्ष म्हणून बादल बेले यांची तर महिला तालुका  अध्यक्षा म्हणून अल्का सदावर्ते यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी दिलीप सदावर्ते ,रजनी शर्मा ,सचिवपदी सुजीत पोलेवार ,अँड. मेघा धोटे तर महिला संघटक राजश्री उपगण्लावार, संघटक सूनैना तांबेकर आदिँचि सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तसेच विजय जांभूळकर यांची जिल्हा संघटक  म्हणून नियुक्ति करण्यात  आहे. राजुरा येथे नेफडो च्या माध्यमातून वंसंवर्धन दीनानीमीत्य व्रूक्षारोपन घेण्यात आले असून नुकताच रक्षाबंधन नीमीत्य शहरातील वेगवेगळ्या शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावी च्या विध्यार्थीकरीता ' सेल्फी विथ व्रुक्ष रक्षाबंधन ' ही स्पर्धा घेण्यात आली होती. 


यामधे शहरातील आदर्श हायस्कूल ,सोनिया गाँधी स्कूल ,इन्फंट् स्कूल ,महात्मा ज्योतिबा विद्यालय या शाळेतील 168 विध्यार्थीनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा दिनांक 1ते  4 आँगस्ट या दरम्यान घेण्यात आली. लवकरच या स्पर्धेचा निकाल जाहीर करून क्रमांकप्राप्त विध्यार्थीचा प्रमाणपत्र ,सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येईल. विशेष म्हणजे कोरोणा संकट काळातही विध्यार्थीनी ऑनलाईन या स्पर्धेत उत्सपूर्थपणे सहभाग नोंदवला. 


येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा घेण्यात येणार आहे असे संस्थेच्या वतीने कळविन्यात आले आहे. निवडझालेल्या पदाधिकारि यांचे अभिनंदन राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस ,महाराष्ट्र अध्यक्ष दीपक भस्वार ,विभागीय उपाध्यक्ष तेजस्वीनी नागोसे ,जिल्हा अध्यक्षा ललिता मूस्कावार ,जिल्हा सचिव रत्ना चौधरी ,जिल्हा संघटक श्रीरंगराव नागोसे ,कविता मोहूर्ले सह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधिकार्याँनि अभिनंदन केले व पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या. 


राजुरा येथील नेफडो अंतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार असून यांकरीता सर्वच क्षेत्रातील व्यक्तिचा सहभाग घेतल्या जाणार आहे. पर्यावरण संवर्धन ,व्रूक्ष लागवड ,प्राणीसंगोपन ,खतनिर्मिती ,सीडबॉल निर्मिती ,पर्यावरणपूरक गणेशोत्सव ,व्रूक्ष रक्षाबंधन ,आदींसह अनेक उपक्रम या संस्थेमार्फत राबविले जाणार असल्याची माहिती नवनीयुक्त अध्यक्ष बादल बेले व अल्का सदावर्ते यांनी दिली आहे.कार्यक्रमाचे सूत्र संचालन बादल बेले यांनी तर आभार प्रदर्शन रजनी शर्मा यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्थावीक अल्का दिलीप सदावर्ते यांनी केले.