वर्धा नदीत पडलेल्या विशाल दासरीचे शव सापडले #rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वर्धा नदीत पडलेल्या विशाल दासरीचे शव सापडले #rajura

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
काल  दिनांक ३ ऑगस्टला दुपारी सव्वा तिन वाजता राजुरा येथून बामणीकडे जातांना वर्धा नदीच्या पुलाजवळील खड्डे चुकवितांना तोल गेल्याने एक मोटरसायकल स्वार आपल्या दुचाकी गाडीसह नदीत पडला. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्यांनी आरडाओरडा करुन मदतीचा प्रयत्न केला. परंतू यावेळी काहीच शक्य न झाल्याने हा इसम नदीत वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली.



घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी येऊन शोध घेतला मात्र, या अज्ञात व्यक्तीचा अद्याप शोध लागलेला नव्हता. 

दुसरीकडे राजुरा शहरातील नगरसेवक आनंद दासरी यांचे पुतणे विशाल ओबय्या दासरी (21) दुपारपासून बेपत्ता असल्याने सर्वत्र शोध घेतला असता काहीही मागोसा न लागल्याने व त्याचा मोबाईल क्रमांक सुद्धा बंद असल्याने वर्धा नदीवरील घडलेल्या घटनेतील युवक हा तर नाही ना?  याकडे शहर वासियांच्या नजरा खिळल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती आपल्या दिशेने येतांना पुलाच्या सुरुवातीला असलेले खड्डे चुकवितांना एकाएकी पुलावरुन मोटरसायकल सह नदीत कोसळला. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांनी आरडाओरडा करुन मदतीचा प्रयत्न केला. पण आज येथे मच्छीमार नसल्याने कुणीही मदत करु शकले नाही. हा इसम पुलाखालील पाण्यातील दुसऱ्या बाजुला आला. तेथे तिन-चार गटांगळ्या खाल्ल्यानंतर तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला. बेपत्ता इसमाचा शोध व या घटनेचा तपास ठाणेदार नरेंद्र कोसूरकर करीत होते. 

आज सकाळी राजुरा पोलिसांनी गोतेखोरांकरावी वर्धा नदी पात्रात शोधमोहीम केली असता दुपारी 12:30 च्या सुमारास नदीत पडलेल्या युवकाची गाडी सापडून आली. सदर गाडी एम एच 34 ए डब्लू 0873 आरटीओ चंद्रपूर यांच्या नोंदणी नुसार ओबय्या गुराप्पा दासरी यांच्या नावे असल्याने. नदीत पडलेला युवक विशाल ओबय्या दासरी असल्याचे निश्चितझाले होते.

तब्बल दोन दिवसांच्या शोध मोहिमे नंतर आज 5 ऑगस्ट ला सकाळी 10:30च्या सुमारास वर्धा नदी पात्रप्रवाहा लगत लाठी नजीक वाहून गेलेले विशाल दासरी चे शव सापडून आले आहे.