खबरकट्टा /चंद्रपूर : राजुरा -
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा तालुकाध्यक्ष संतोषभाऊ देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा येथील सरकारी दवाखान्यात प्रसूती झालेल्या सर्व महिलांना बेबी किट चे वाटप करण्यात आले, तसेच राजुरा येथील पंचायत समिती सभापती क्वार्टर जवळ वृक्षारोपण करण्यात आली.
तसेच JCI अध्यक्षा सौ. शुक्ला मॅडम, युवा पत्रकार जाकीर सय्यद तथा आसीफ सय्यद मित्रमंडळ च्या वतीने घेण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात संतोषभाऊ देरकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच सायंकाळी सर्व मित्रमंडळ तर्फे BSP राजुरा विधानसभा निरीक्षक आशिषभाऊ करमरकर तथा संतोष भाऊंचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी राजुरा विधानसभेचे माजी आमदार मा. संजय धोटे, राष्ट्रवादी तालुका यूवक काँग्रेसचे अध्यक्ष आसिफ सय्यद, JCI अध्यक्षा JC सुषमा शुक्ला, डॉ. कुळमेथे, मोहन कलेगुरवार, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार, युवक शहर अध्यक्ष स्वप्नील बाजुजवार, ऑस्टिन सावरकर, भूपेश मेश्राम, पराग दातारकर, राजू दडगड, रकीब शेख, अंकुश भोंगळे, स्वप्नील रासेकर, अंकुश चव्हान, अंकुश कायरकर, निखिल बोंडे, चंदू देरकर, आकाश वाटेकर, शैलेश मोहनकर, महेश वडस्कर, पराग हिंगाने, गोपाल शिंदे, साहिल शेख, तथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका व शहर, राष्ट्रवादी तालुका व शहर युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तथा संतोषभाऊ मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.