बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधींकडुन दुर्लक्ष अपघात टाळण्यासाठी अखेर युवकांनीच श्रमदानातुन केली रस्त्याची दुरूस्ती ! #rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधींकडुन दुर्लक्ष अपघात टाळण्यासाठी अखेर युवकांनीच श्रमदानातुन केली रस्त्याची दुरूस्ती ! #rajura

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

स्वातंत्र्यप्राप्तीला ७० वर्षाचा कालावधी उलटुनहीं राजुरा तालुक्यातील निर्ली ते पेल्लोरा हो दोन गावे अद्यापही रस्त्यांनी जोडली नसुन हा ३ कि.मी. पांदण रस्ता अजुन झालेला नाही. 

या रस्त्याने विद्यार्थ्यांना झाडे-झुडुपांमधुन वाट काढत पेल्लोरा येथील शाळा -महाविद्यालयात जावे लागते. तसेच दोन्ही गावातील शेतकरी त्यांचे शेतात याच रस्त्याने जातात. मात्र रस्त्याचे डांबरीकरण तर सोडा साधे खडीकरणही झालेले नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. अशातच पावसाचे दिवस असल्यामुळे चिखल आणि नाल्याचे काठावर चढतांना बैलबंडी उलटण्याची शक्यता निर्माण झाली होती. 

अनेकदा बैलगाडी ओढतांना बैल घसरून जखमी देखोल झालेले आहे. यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता लोकप्रतिनिधी, बांधकाम विभागाची वाट न बघता येथील युवकांनी पुढे येत श्रमदान करून रस्ता दुरूस्त केला. या कामात काँग्रेस ओबीसी सेल चे उमाकांत धांडे यांच्या मार्गदर्शनात विजय धांडे, बाबाराव उमरे, रामा धांडे, पंकज दुबे, स्वप्नील क्षीरसागर, संजय उमरे, मिलींद पाटील, सचिन धांडे, प्रदीप दुबे, राजेश धांडे यांनी परीश्रम घेतले.

याठिकाणी दोन्ही गावातील जनतेची मागणी लक्षात घेता निर्ली कडुन कि.मी. मातीकाम तर पेल्लोरा कडुन अर्धा कि मी. रस्त्याचे खडीकरण पुर्ण झालेले आहे. सदर रस्ता कढोली बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा पर्यंत जोडला नागरीकांना चंद्रपुरला जाण्यास सोयीचा आहे. या अनुषंगाने तत्कालीन पालक मंत्री यांना डिसेंबर २०१८ मध्ये निवेदन देण्यात आले होते. त्यानी राजुराचे संवर्ग आणि पत्राव्दारे दिले होते. मात्र पुढे काहीही झाले नाही. विद्यमान आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांनाही वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहे.

या परीसरातील रूग्णांना उपचारास जाण्याकरीता आवश्यक आहे. तसेच विकास अधिकारी यांना ७ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश फोनवरून सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही अनेकदा पाठपुरावा करण्यात आला जि. आणि पं. स. सदस्य यांचे ही याकडे लक्ष नाही हे येथे उल्लेखनिय !