वर्धा नदीत मोटरसायकल सह युवक पडला - अद्याप बेपत्ता #rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वर्धा नदीत मोटरसायकल सह युवक पडला - अद्याप बेपत्ता #rajura

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

आज दिनांक ३ ऑगस्टला दुपारी सव्वा तिन वाजता राजुरा येथून बामणीकडे जातांना वर्धा नदीच्या पुलाजवळील खड्डे चुकवितांना तोल गेल्याने एक मोटरसायकल स्वार आपल्या दुचाकी गाडीसह नदीत पडला. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्यांनी आरडाओरडा करुन मदतीचा प्रयत्न केला. परंतू यावेळी काहीच शक्य न झाल्याने हा इसम नदीत वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली.घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी येऊन शोध घेतला मात्र, या अज्ञात व्यक्तीचा अद्याप शोध लागलेला नाही.


मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती आपल्या दिशेने येतांना पुलाच्या सुरुवातीला असलेले खड्डे चुकवितांना एकाएकी पुलावरुन मोटरसायकल सह नदीत कोसळला. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांनी आरडाओरडा करुन मदतीचा प्रयत्न केला. पण आज येथे मच्छीमार नसल्याने कुणीही मदत करु शकले नाही. हा इसम पुलाखालील पाण्यातील दुसऱ्या बाजुला आला. तेथे तिन-चार गटांगळ्या खाल्ल्यानंतर तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला. बेपत्ता इसमाचा शोध व या घटनेचा तपास ठाणेदार नरेंद्र कोसूरकर करीत आहेत.