बल्लारपूर गोल पुलियावर रेल्वे रुळावरून घसरली : सुदैवाने मोठी दुर्घटना टळली #railway slip - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बल्लारपूर गोल पुलियावर रेल्वे रुळावरून घसरली : सुदैवाने मोठी दुर्घटना टळली #railway slip

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर /बल्लारपूर, 10 ऑगस्ट (प्रतिनिधी):


चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह हा मध्य रेल्वेचा प्रमुख जंक्शन आहे. येथून जाणार्‍या प्रत्येक सुपरफास्ट, वेगवान, एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेनला 10 ते 15 मिनिटांचा थांबा असतो.बल्लारपूर शहरातून रेल्वे स्टेशन च्या बाजूने चंद्रपूर कडे येताना मार्गावर जुन्या वस्तीला आणि नवीन वस्तीला जोडणार्‍या गोल पुलकावरील रेल्वे पुल पुढे जाताना आज अचानक या फेरी पुलावरुन मालगाडी रुळावरून घसरली.सुदैवाने गोल पुलावरच वरची गाडी मोठ्या घसरल्यावर पलटत जाऊन रुळाखाली घसरून पडली नाही, अन्यथा मोठे नुकसान झाले असते. हे वर्दळीचे ठिकाण असून दिवसरात्र या पुलाखालून रहदारी सुरु असते. 

संदर्भात बल्लारपूर स्टेशन मास्टर यांचेशी संपर्क साधला असता तात्काळ रेल्वे तांत्रीक रोलर चमू ने घटनास्थळ गाठत साहाय्य पोहोचविले व रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात आला.