राष्ट्रीय महामार्गावरील खाड्यांमध्ये लावली बेशरमाची झाडे : राजुरा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आसीफ सय्यद यांनीं वेधले राष्ट्रीय रस्ते महामार्ग दुरुस्तीकडे लक्ष #pwd - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राष्ट्रीय महामार्गावरील खाड्यांमध्ये लावली बेशरमाची झाडे : राजुरा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आसीफ सय्यद यांनीं वेधले राष्ट्रीय रस्ते महामार्ग दुरुस्तीकडे लक्ष #pwd

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

राजुरा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आसीफ सय्यद यांच्या नेतृत्वात सोंडो येथे राजुरा-आसिफाबाद राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमध्ये बेशरमांची झाडे लावून आंदोलन करण्यात आले. 


मागील अनेक दिवसांपासून राजुरा ते आसिफाबाद महामार्गावर जागो जागी जीवघेणे खड्डे पडले असून या महामार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कित्येक दिवसांपासून संबंधित अधिकाऱ्यांना राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पाठपुरावा करून सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. 


त्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी तालुक्यातील सोंडो येथे राजुरा आसिफाबाद महामार्गावर खड्ड्यांमध्ये बेशरमांची झाडे लावण्यात आली.


यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष देरकर, युवक तालुकाध्यक्ष आसिफ सय्यद, राजुरा शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार, युवक शहर अध्यक्ष स्वप्नील बाजूजवार, सोंडो ग्रामपंचायत सदस्य दादाजी उमरे, शहर उपाध्यक्ष रखिब शेख, शहर महासचिव अंकुश भोंगळे, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते राजू ददगाड, राष्ट्रवादी तालुका सचिव सतीश तेलजिरवार, बब्बु सय्यद, अभी सूर्यवंशी, श्रावण कालिवार व राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाधिकारी तथा मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.