पुर्वा खेरकर राष्ट्रीय सॉफ्टबेसबॉल पंच परीक्षा उत्तीर्ण #Purva Kherkar passed the National Soft Baseball Punch Examination - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पुर्वा खेरकर राष्ट्रीय सॉफ्टबेसबॉल पंच परीक्षा उत्तीर्ण #Purva Kherkar passed the National Soft Baseball Punch Examination

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा - 

जागतिक पातळीवर महामारी चे संकट उद्भवले असताना देखील शिक्षणाचे दार उघडे आहे याची प्रचिलीती हि ऑनलाइन शिक्षण ने दिली आहे. या शिक्षण पद्धतीत शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग देखील मागे नाही असे दिसते आहे. 

भारतीय सॉफ्टबेस बॉल संघटने द्वारे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील पंच व तांत्रिक अधिकारी कार्यशाळा व परिक्षेसाठी राजुरा सारख्या ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातील कार्यरत शारीरिक शिक्षिका कु पुर्वा गणेशराव खेरकर हिने सहभाग घेतला असून तिने हि परीक्षा अव्वल गुणांनी उत्तीर्ण देखील केली आहे.  सॉफ्टबेस बॉल खेळातील  जिल्हातुन प्रथमच पंच व तांत्रिक अधिकारी होण्याचा बहुमान पुर्वा हिला प्राप्त झालाय. 

विविध क्रीडा संघटनेत कार्यरत पुर्वा खेरकर हीच्या यशा बद्दल भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचा अध्यक्षा श्रीमती रोहिणी बाड, सचिव श्री नामदेव शिंदे तसेच   महाराष्ट्र सॉफ्टबेस बॉल संघटनेचे सचिव श्री बाळासाहेब रनशूर यांनी अभिनंदन केले.