चंद्रपूर बिग ब्रेकिंग : पोलिसाची गाडी पेटविली #police vehicle on fire at chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर बिग ब्रेकिंग : पोलिसाची गाडी पेटविली #police vehicle on fire at chandrapur

Share This

 खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

कोरपना पोलीस ठाणे अंतर्गत सोनुर्ली या गावात आज 11ऑगस्ट सकाळी 9:00 वाजताच्या च्या दरम्यान कोरपना पोलीस ठाण्यात कार्यरत बिट जमादार सुधीर तिवारी यांची पल्सर गाडी जाळण्यात आली आहे. 


सोनुर्ली येथील गावकऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहिती नुसार गाडी जाळणारा युवक जगदीश बूचुंडे (22), आज सकाळी घरगुती वादातून आई वडिलांच्या मागे धारदार वस्तू ने धाक दाखवत असल्या कारणाने नातेवाईकांनी पोलिसांना बोलाविले असता जमादार तिवारी यांची गाडीच त्याने पेटवून दिली व आता धारदार वस्तू घेऊन गावातील चौकात फिरत असल्याने भीतीदायक वातवरण निर्माण झाले आहे. 


घटनास्थळी संपूर्ण गाव भयभीत झाला असून  टीम खबरकट्टा ने कोरपना ठाणेदार यांचेशी संपर्क साधला असत घटनास्थळी रवाना झाले असल्याचे सांगितले. 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....