जिल्ह्यात कोविड – 19 कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. घुग्घुस येथील रामनगर मध्ये 2, इंदिरानगर 2, शालीकराम नगर 1, नकोडा 2, एसीसी 1 अशी संक्रमित रुग्ण संख्या असून देखील येथील भाजप नेत्यांना कोरोना संसर्गाचा व जनतेच्या आरोग्याचा काही घेणे देणे नसल्याचे शंका नागरिकांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.
घुग्गुस शहरातील भाजप नेते हेमंत उरकुडे यांच्या धम्माल वाढदिवस पार्टीची चर्चा थंड होत नाही तोच काल दिनांक 1 ऑगस्ट रोजी भाजप नेते शरद गेडाम यांची जंगी पार्टीचा बेत वॉर्ड नंबर 2 येथील चांद शाह वली दर्गा परिसरात खुल्या मैदानात ठेवण्यात आला.
परिसरात याची कुज – बूज लागताच भयभीत नागरिकां तर्फे निनावी फोन द्वारे या पार्टीची तक्रार घुग्घुस पोलिसांना देण्यात आली.
घुग्घुस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक नागलोन पार्टीस्थळी पोहचले असता त्याठिकाणी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली मिळेल त्या गल्लीतून कार्यकर्ते पळाले व 30 ते 40 च्या जवळपास पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
या पूर्ण प्रकाराची माहिती उपनिरीक्षक नागलोन यांनी पोलीस स्टेशनला दिली यासंदर्भात नागलोन यांची प्रतिक्रिया घेतली असता आपण सदर माहिती स्टेशनला दिली असून पुढील तपास व कारवाई वरिष्ठ अधिकारी घेतील असे सांगितले.
या पार्टीत राजकिय वजन असलेले नेते उपस्थित होते, त्यामुळे राजकीय बळाचा वापर होणार हे निश्चितच आहे.
आता या प्रकरणात कोविड नियमानुसार गुन्हे दाखल होते ?की मागच्या पार्टी सारखे प्रकरण थंड बसत्यात जाते याकडे घुग्घुस वासीयांचे लक्ष लागले आहेत.