चंद्रपूर ब्रेकिंग : पत्नीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न : जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना #petrol - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : पत्नीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न : जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना #petrol

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वृत्त साभार : सुरज बोम्मावार, सावली स्वतःचाच पत्नी च्या चरित्रावर संशय घेऊन मारहाण करणे व नंतर तिला जिवंत जाळण्यासाठी अंगावर पेट्रोल टाकल्याचा प्रकार पोलीस स्टेशन सावली अंतर्गत येत असलेल्या किसाननगर या गावामध्ये घडलेला असून आरोपी ला पोलिसांनी अटक केली आहे.


सविस्तर वृत्त असे की किसान नगर येथील आकाश गरीबचंद मजोके वय 23 वर्ष याने स्वतःची पत्नी ज्योती आकाश मजोके वय 20 वर्ष हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ व मारहाण करायचा.


काल दिनांक 22 ला दुपारच्या सुमारास आरोपी आकाश ने एका बॉटल मध्ये पेट्रोल भरून आणला व सायंकाळी पत्नी ज्योती ला मारहाण करीत तिच्या अंगावर पेट्रोल ओतले व आगपेटी ची काळी आणण्यासाठी स्वप्नांक घरात जाताच महिला आरडाओरड करीत घराबाहेर पडली व ती स्वतःचा माहेरघरी गेली. 


घटनेची माहिती स्वतः च्या भावांना देताच त्यांनी आरोपी चे घर गाठून त्याला बेदम मारहाण केली व काच फोडून आकाश ला घाव केले.


या संदर्भात माहिती सावली पोलिसांना देण्यात आली त्यावरून ज्योती च्या तक्रारी वरून अपराध क्रमांक 186/20 कलम 307,323,504 गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपी ला अटक करण्यात आली आहे.


तर मला काचेने मारहाण केली म्हणून आकाश च्या तक्रारी वरून सतीश भागराज मजोके,पिंटू भागराज मजोके,संजय भागराज मजोके सर्व रा.किसननगर यांचावर अपराध क्रमांक 187/20 कलम 324,452,504,506 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अनुज तारे यांचा मार्गदर्शनात सावली चे ठाणेदार कुमारसिंग राठोड करीत आहे.