जिल्हाधिकाऱ्यांची बदली रद्द करा : जनविकास सेनेच्या पप्पू देशमुखांचे डोळ्यावर पट्टी आंदोलन #pappu deshmukh - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हाधिकाऱ्यांची बदली रद्द करा : जनविकास सेनेच्या पप्पू देशमुखांचे डोळ्यावर पट्टी आंदोलन #pappu deshmukh

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : 

काल 10 ऑगस्ट ला अचानक चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची बदली करण्यात आली.त्यांच्याबदली श्री.अजय गुल्हाने यांना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.  


शासनाने केलेल्या या बदलीच्या विरोधात जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डोळ्यावर पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. 


जिल्हाधिकारी हे पेशाने डॉक्टर आहेत.मागील चार महिन्यापासून covid-19 आपत्तीचे अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करीत आहेत.कोविडची आपत्ती आल्यानंतर तीन महिन्यापर्यंत चंद्रपुरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला नाही यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या नियोजनाचं व त्यांच्या नेतृत्वात चतुर्थश्रेणी कर्मचारी ते अधिकारी व कंत्राटी कामगार या सर्वांच्या टीमने अतिशय चांगले काम केलेले आहे. 


जिल्हाधिकारी यांना चंद्रपुरात केवळ दोन वर्ष झाले. प्रामाणिक व होतकरू अधिकारी असलेले डाॅ.खेमनार यांनी जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.