बिबट्याने मांडले घरात ठाण : आज सकाळची घटना :बघ्यांची अलोट गर्दीआला रे आला वाघ आला : देवपायली येथे प्रसाधनगृहात सकाळीच शिरला बिबट.स्वप्नील मासुरकरला बिबटाने केले जख्मी #nagbhid - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बिबट्याने मांडले घरात ठाण : आज सकाळची घटना :बघ्यांची अलोट गर्दीआला रे आला वाघ आला : देवपायली येथे प्रसाधनगृहात सकाळीच शिरला बिबट.स्वप्नील मासुरकरला बिबटाने केले जख्मी #nagbhid

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :नागभीड:


नागभीड तालुक्यातील देवपायली येथे बिबट्याने गावात येऊन घरात ठाण मांडले आहे. या प्रकाराने बाळापूर परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. वन विभागाची चमू गावात दाखल झाली आहे.

गावात प्रवेश केला. प्रवेश केल्या केल्याच संदीप मडावी यांच्या यांच्या घराच्या आवारात प्रवेश करून कोंबड्यावर ताव मारला. यानंतर आरडाओरडा होताच त्याने तेथून धूम ठोकली व बाजूलाच असलेल्या शौचालयात ठाण मांडले. या दरम्यान रस्त्यावर उभे असलेल्या स्वप्नील रामदास मासूरकर (२८) या तरूणाला पायावर झडप मारून जखमी केले.

दरम्यान वन विभागाला ही माहिती देण्यात आली.तळोधी वनपरिक्षेत्राचे अधिकारी गावात दाखल झाले असून बिबट्यास पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

    
सविस्तर वृत्तानुसार नागभीड तालुक्यातील तळोधी ( बाळापुर ) येथून १२ किमी दूर अंतरावर असलेले देवपायली गावात आज २१ आगष्टला सकाळी एकच आरोळी निनादत होती.आला रे आला वाघ आला, गावामध्ये वाघ आला.
  
सकाळची वेळ असल्यामुळे काही साखरझोपेत होती.काही प्रात:विधीकरीता बाहेर पडली होती तर काही घरासमोर साफ-सफाई करीत होती. सर्वानी आरोळी ऐकताच वाघाचे दिशेने धाव घेतली. बिबट जातीचा वाघ आरामात वनविभागाचे कार्यालयासमोर आरामात फिरत होता.त्याने संदीप मडावी यांचे घरी कोंबडयावर ताव मारला. गावकरी हळूहळू वाढत होते. गावक-यांनी बिबटाला गावा बाहेर घालवण्याचा प्रयत्न केला. 

पण बिबट गावा बाहेर जाण्याऐवजी गावात शिरला. गावात स्वप्नील चरणदास मासुरकर हा घरासमोर संडास चे सामोरील मोकळया जागेत बकरी बांधत  होता , त्याचेवर हल्ला करून जख्मी केले.व त्याचेच संडासात लपून बसला. याची माहीती वनविभागाला कळताच तळोधी परीक्षेत्राचे क्षेत्र सहायक के.डी.गरमडे यांचे नेतृत्वात वनरक्षक एस.बी.चौधरी व एन.डी पेंदाम व इतर कर्मचारी यानी बिबट पकडण्याकरीता मोहीम राबविली व बिबटाला जेरबंद केले.
         
माहिती मिळताच या क्षेत्राचे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी देवपायली ला त्वरेने पोहचुन घटनास्थळी भेट दिली. जखमी झालेल्या स्वप्नील मासुरकर ची विचारपुस करुन पुढील उपचारासाठी दवाखान्यात रवाना केले. यावेळी बिबटाला बघण्याकरीता परीसरातील बाळापूर; पारडी; सोनूली, बोंड ,तळोधी व नवानगर येथील जनतेनी एकच गर्दी केली होती.वनविभागाकडून जख्मी स्वप्नीलला त्वरीत  अनुदान मिळावे अशी गावक-यांनी व जि.प. सदस्य संजय गजपुरे यांनी मागणी केली आहे.