नागभीड येथील रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या ?#nagbhid - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नागभीड येथील रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या ?#nagbhid

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड - 

नागभीड पोलिस स्टेशन अंतर्गत बाम्हणी - मांगली मार्गावर रक्ताच्या थारोळ्यात इसमाचा मृतदेह आढळल्याने हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.

गुरूदेव तुळशीराम चौधरी (४२) रा.मांगली (अरब) असे मृतकाचे नाव असून. तो रेल्वे विभागात नागभीड रेल्वे स्टेशनवर नोकरीवर कार्यरत होता. काल सायंकाळी ७ च्या सुमारास तो रेल्वे स्टेशन वरून घरी येण्यासाठी स्वतःच्या दुचाकी स्कुटीने निघाला. वाटेतच मांगलीकडे जाताना बाम्हणी गाव ओलांडल्या नंतर पुलावर त्याचा मृतदेह आढळला. 


त्याच्या डोक्यावर जबर मार असल्याने चेहरा रक्तबंबाळ झालेला दिसून आला. मांगली बाम्हणीच्या मधोमध पुलाजवळ झाडे झुडपे असल्यामुळे काही अज्ञात व्यक्तीनी हत्येचा कट रचून गुरूदासची हत्या केली असावी अशा चर्चास परिसरात ऊत आला आहे.


घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह आज उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले.सदर प्रकरणी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. मृतकाला आई,पत्नी व दोन मुलं असा परिवार आहे.