मनपा ला प्रति कोविड रुग्ण दीड लाख मिळत असल्याची फक्त अफवा :अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये आणि आजाराची काही लक्षणं दिसल्यास तातडीनं समोर येऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन #mncchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मनपा ला प्रति कोविड रुग्ण दीड लाख मिळत असल्याची फक्त अफवा :अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये आणि आजाराची काही लक्षणं दिसल्यास तातडीनं समोर येऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन #mncchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

चंद्रपूर महापालिकेला कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी प्रतिरुग्ण दीड लाख रुपयांचा निधी येत आहे, त्यामुळे रुग्णांची संख्या मुद्दाम अधिक दाखवली जाते, अशी अफवा चंद्रपुरात पसरली आहे. 

त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या ही निधी मिळवण्यासाठी असल्याची सर्वत्र चर्चा सर्वसामान्य नागरिकांत सुरू आहे. अशा चर्चांवरून नागरिक कोरोनाकडे वेगळ्याच नजरेनं बघू लागले व कोरोना प्रादुर्भावाविषयी निष्काळजी बाळगत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेले दोन दिवस या चर्चेला शहरात प्रचंड पीक आले आहे. 

या संदर्भात टीम खबरकट्टा ने महानगर पालिकेशी संपर्क साधला असता त्यांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

आयुक्त राजेश मोहिते यांनी दूरध्वनीवरून सांगितले की खनिज विकास निधीतील पहिल्या हप्त्या व्यतिरिक्त कोणताही निधी चंद्रपूर महानगरपालिकेला प्राप्त झाला नसून शहरात रुग्ण संख्या कमी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजनांवर भर दिल्या जात आहे. मनपा चे दोन कर्मचारी सुद्धा बाधित आढळले आहेत शिवाय स्वछता कर्मचाऱ्यांना  सुरक्षा उपयोजना व शहरात सातत्याने सॅनिटायझेशन पासून ते मनपा अंतर्गत आरोग्य सुविधा स्वखर्चातून दिले जात आहे. कोविड-19 च्या उपयोजनांकरिता राज्य किंवा केंद्र सरकार कडून कोणताही विशेष निधी अद्याप घोषित किंवा प्राप्त झाला नाही.

प्रतिरुग्ण दीड लाख रुपयांचा निधी महापालिकेला येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी खनिज विकास निधीतून दोन कोटी 33 लाख रुपये महापालिकेला उपलब्ध करून दिले असून, त्यातून व्यवस्थेवरील खर्च भागवला जात आहे. उलट जिल्ह्यातील इतर रुग्ण मनपा क्षेत्रात क्वारंटाइन केले जात आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांतील सात्यत्याने सॅनिटायझेशन, कॉन्टाईनमेंट झोन चा खर्च सुद्धा मनपा उचलत आहे.  त्यामुळं अशा अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये आणि आजाराची काही लक्षणं दिसल्यास तातडीनं समोर येऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी महापालिकेच्या वतीने केले आहे.