ब्रेकिंग : मनपा चंद्रपूर मध्ये दुसरा कोरोना बाधित :उपायुक्त यांचा स्वीय सहाय्यक पॉसिटीव्ह : तात्काळ एक दिवसांकरिता मनपा बंद - राजेश मोहिते, आयुक्त, मनपा, चंद्रपूर #mncchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : मनपा चंद्रपूर मध्ये दुसरा कोरोना बाधित :उपायुक्त यांचा स्वीय सहाय्यक पॉसिटीव्ह : तात्काळ एक दिवसांकरिता मनपा बंद - राजेश मोहिते, आयुक्त, मनपा, चंद्रपूर #mncchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

चंद्रपूर महानगर पालिकेत आणखी एक कोरोना बाधित आढळल्याचे वृत्त आहे. सदर कर्मचारी हा मनपा उपायुक्त यांचा स्वीय सहाय्यक असल्याने अधिकारी वर्गात खळबळ उडाली असून सर्व कार्यालये तात्काळ सॅनिटाईझ करण्यात येत आहे. 

25 जुलै ला मनपामध्ये पहिला बाधित आढळल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या तपासण्या सुरूच असताना आज 4 ऑगस्ट ला अचानक दुसरा बाधित पुढे आल्याने अतिदक्षता म्हणून पुढील 24 तासांकरिता मनपा कार्यालय व कामकाज बंद ठेवण्यात येत असल्याचे आयुक्त श्री. राजेश मोहिते यांनी टीम खबरकट्टा ला दिली. 24 तासानंतर कामकाजी निर्णय उद्या घेण्यात येणार असून निदान दोन दिवस मनपा मध्ये अभ्यंगताना प्रवेश बंद राहील.