घरघुती सिलेंडर चा स्फोट : शासनाची तात्काळ मदत : आज सायंकाळची घटना #lpg - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

घरघुती सिलेंडर चा स्फोट : शासनाची तात्काळ मदत : आज सायंकाळची घटना #lpg

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


राजुरा पासून 6 किमी दूर असलेल्या मौज आर्वी येथे स्वयंपाक बनवितांना एलपिजि गॅस ला आग लागली. महिलेचा सूचकतेने आणि गावकऱ्यांनी लगेच मदतीला धावून येण्याने मोठा अनर्थ टळला.आर्वी येथे नामदेव बाबूराव मस्की यांचे घरी आज सायंकाळी 6:30 वाजता स्वयंपाक बनवितांना अचानक गॅस ला आग लागली. यावेळी सौ. मस्की घरात एकट्याच होत्या. आग लागताच सौ मस्की यांनी घराबाहेर येत आरडाओरड केली. गॅस ला आग लागल्याची माहिती मिळताच काही वेळा साठी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. 


गावातील लोक मदतीला धावून आले. गावातील लोकांनी पाणी, माती याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला याचातच गावातील लोकांनी हिम्मतीने स्वयंपाक घरात जाऊन सिलेंडर चा कॉक बंद केला व आडोका टाकून सिलेंडर घराबाहेर काढला. 


तोपर्यंत आगीने स्वयंपाक घराचे चांगलेच नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पटवारी चिडे यांनी तात्काळ गावात पोहचून पंचनामा केला व आपदागस्त नामदेव मस्की यांना शासनातर्फे तात्काळ धान्य वाटप करण्यात आले.