चंद्रपुर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन होणार ???? : कोरोना बाधितांची वाढती संख्या : कम्युनिटी स्प्रेड कडे वाटचाल #lockdown chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन होणार ???? : कोरोना बाधितांची वाढती संख्या : कम्युनिटी स्प्रेड कडे वाटचाल #lockdown chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


चंद्रपूर दररोज कोरोना पोझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. हा आकडा पाहता कम्युनिटी स्प्रेड कडे वाटचाल सुरू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून, आता लॉकडाउनची खरी गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे हा पॉझिटिव्ह रेट पाहता पुढील दोन-तीन दिवसात कडक लॉकडाउन लावण्याचे संकेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी दिले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३४ झाली आहे. मे महिन्याच्या २ तारखेला पहिला रुग्ण सापडला होता. जवळपास चार महिन्यात हा आकडा १८०० वर पोहोचला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या डेथ ऑडिटमध्ये कोरोनाने मृत्यू पावलेला रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर ४८ तासाच्या आत दगावल्याचे दिसूनदरम्यान, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन, महानगपालिका प्रशासन, आरोग्य्ंत्रणा तसेच व्यापारी वर्गातूनही लॉकडाउनची आता खरी गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आहे. 'कम्युनिटी स्प्रेड'कडे वाटचाल सुरू आहे. हे संक्रमन रोखण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनात बैठकांचे सत्र सुरू आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनीसुद्धा आता कड़क लॉकडाउनची आवश्यकता असल्याचे सुतोवाच केले आहे.


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेशी चर्चा करून येत्या दोन-तीन दिवसात कडक लॉकडाउन करणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी गुल्हाणे यांनी दिले आहे.