राज्यातील शेतक-यांमध्ये कोरोना पेक्षा जनावरांच्या लम्पी आजाराची दहशत #lampi skin disease in animals - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राज्यातील शेतक-यांमध्ये कोरोना पेक्षा जनावरांच्या लम्पी आजाराची दहशत #lampi skin disease in animals

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : 

कोरोनाचे संकट जगभरासह भारतातही कहर करीत असताना मार्चपासून मनुष्यावरील कोरोना महामारीच्या संकटा पाठोपाठ राज्यात जनावरांवर देखील लम्पी या संक्रमीत आजाराने एप्रिल महिन्यापासून आक्रमण केल्याने ऐन हंगामात बैल,गाय आजारी पडल्याने शेतकNयांमध्ये आता कोरोना पेक्षा जनावरांमध्ये पसरत असलेल्या लम्पी आजाराची दहशत पसरली आहे. राज्यातील १८ जिल्ह्यात जनावरांवर लम्पी आजाराची लागण झाली असून नागपूर विभागातील सर्व सहाही जिल्ह्यात हजारो जनावर लम्पी आजाराने ग्रस्त आहे.


चंद्रपूर जिल्ह्यात ४९६४२ जनावर या आजाराने बाधित झाले आहे.शासनाकडून जनावरांवर उपचार लसीकरणाद्वारे यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.ऐन हंगामात जनावरांवर नेहमीच्या आजारापेक्षा क्वचीतच आढळणारा लम्पी आजार आढळून येत आहे. लम्पी आजार झालेल्या जनावरांच्या अंगावर गाठी येतात त्या गाठीतून पाण्यासारखा पस बाहेर पडतो. जनावरांना सुज येते त्यांच्या शरीराचे तापमान वाढते यामुळे जनावर सुस्त पडून त्यांच्या हालचाली मंदावत असतात. 


हा आजार संक्रमीत असल्याने दुसNया जनावरांमध्ये पसरत असतो. ऐन हंगामात बैल आजाराने पडल्याने शेतकNयांवर संकट ओढावले असून गायीसारख्या दुधाळू जनावर आजारी पडल्याने दुग्ध उत्पादक शेतकरी देखील आर्थीक अडचणीत सापडला आहे. शासनाद्वारे आजारी जनावरांवर उपचार तसेच लसीकरण मोहिम राबवून आजारावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले जात आहे.


राज्यातील १८ जिल्ह्यात लम्पी आजार पसरला असून नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा,भंडारा, गोंदिया या सहाही जिल्ह्यात आजार सर्वदूर पसरला आहे.आतापर्यंत केवळ एक जनावराची लम्पी आजाराने मृत्यू झाल्याची नोंद आहे.


चंद्रपूर जिल्ह्यात सर्व १५ तालुक्यात जनावरांवर लम्पी आजार आढळून येत आहे. एप्रिल महिन्यात सिंदेवाही तालुक्यात पहिल्यांदा जनावरांवर लम्पी आजार आढळून आला. पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहिम राबविण्यात सुरुवात केली. सध्या संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनावरांवर लम्पी आजार आढळून येत आहे. जिल्ह्यातील ४ लाख ४१ हजारावर असलेल्या जनावरांपैकी बाधित जनावरांची संख्या ४९६४२ आहे तर या आजारातून बरे झालेल्या पशुंची संख्या ३४७३० आहे. 


पशुसंवर्धन विभागाने आतापर्यंत ३३२५० जनावरांचे लसीकरण केले असून जवळपास ७९००० लसीचा पुरवठा करण्यात आला आहे.जिल्ह्यातील १४६० गावांपैकी ७८१ गावातील जनावरांमध्ये हा आजार आढळून आला आहे.