शेतीमाल व्यापार सुधार संबंधी अध्यादेश निर्णय मागे न घेण्यासाठी तहसीलदारांना निवेदन #korpna - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतीमाल व्यापार सुधार संबंधी अध्यादेश निर्णय मागे न घेण्यासाठी तहसीलदारांना निवेदन #korpna

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना-

शेतकरी संघटना तालुका कोरपना च्या वतीने केंद्र सरकार द्वारा पारित शेतीमाल व्यापार सुधारा संबंधी अध्यादेश  निर्णय  शासनाने मागे न घेण्यासाठी तहसीलदार कोरपना  यांच्यामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.


केंद्र सरकारने शेतीमाल व्यापार व्यवस्था सुधारा संबंधी तीन अध्यादेश  5 जून 2020 रोजी पारित केले. यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी संपविणे, ऑनलाईन शेतमाल व्यापारात द्वारे एक देश एक बाजार व्यवस्था निर्माण करणे, जीवनावश्यक वस्तू कायद्यातून शेतमाल वगळणे, करार शेतीला प्रोत्साहन देणे हे निर्णय शेती व्यवसायाच्या दृष्टीने फायद्याचे आहे. यासाठी शेतकरी संघटनेने मागणी लावून धरली होती. 


ती आता प्रत्यक्षात साकार झाली आहे. याला काही संघटना व पक्ष विरोध करत आहे. त्यामुळे त्यांच्या दबावाला बळी न पडता हा निर्णय कायम ठेवावा व कोरपना येथील सी सी आय कापूस संकलन केंद्र साठी कॉटण कार्पोरेशन ऑफ इंडिया यांनी निविदा काढाव्या ही मागणी निवेदनातून करण्यात आली. 


निवेदन देतेवेळी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अरुण नवले, युवा जिल्हाध्यक्ष अड श्रीनिवास मुसळे, माजी समाज कल्याण सभापती नीलकंठ कोरांगे, तालुकाप्रमुख बंडू राजूरकर, युवा प्रमुख पद्माकर मोहितकर , रमाकांत मालेकर, मदन सातपुते, नगरसेवक सुभाष तूराणकर,आशिष मुसळे आदी सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.