बल्लारपूरात लाठीचार्ज : सुरज बहुरिया मृत : दोन आरोपींचे आत्मसमर्पण : बहुरिया मृत घोषित होताच समर्थक गेले पोलीस ठाण्यावर चढून : आरोपींना चोप देण्याचा प्रयत्न #gun firing at ballarpur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बल्लारपूरात लाठीचार्ज : सुरज बहुरिया मृत : दोन आरोपींचे आत्मसमर्पण : बहुरिया मृत घोषित होताच समर्थक गेले पोलीस ठाण्यावर चढून : आरोपींना चोप देण्याचा प्रयत्न #gun firing at ballarpur

Share This

 खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात -बल्लारपुरात गोळीबार : सुरज बहुरिया वर भर चौकात गोळीबार #gun firing at ballarpur

बल्लारपूर शहरातील जुना बस स्टॅन्ड परिसरात बल्लारपूर कडून बामणी कडे जात असताना चारचाकी गाडीत बसून जात असताना अवैध कोळसा व्यापारी सुरज बहुरिया नामक युवकावर भर भर चौकात गोळीबार झाला असल्याची घटना आज 8 ऑगस्ट च्या दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडल्याने परिसरात प्रचंड तणाव आहे. 

पोलिसांनी न तात्काळ घटनास्थळ गाठत  परीसर ताब्यात घेतला असून प्रतिदर्शीनुसार सुरज बहुरिया वर अंदाजे 5-6 गोळ्या झाडण्यात आल्या असल्याने तात्काळ चंद्रपूर रुग्णालयात पाठविण्यात आले असता मृत घोषित करण्यात आले.

बल्लारपूर शहरात गुंड प्रवृत्तीच्या विरोधीगटात सातत्याने  वाढते गँग वॉर चिंतेचा विषय आहे. हे गोळीबार प्रकरण सुद्धा याच गँग वॉर चा भाग असल्याचे चर्चेत आहे. 

दरम्यान सुरज बहुरिया मृत घोषित झाल्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींनीं बल्लारपूर पोलीस ठाणे येथे आत्मसमर्पण केले कळताच त्याच्या 250-300समर्थकांनी पोलीस ठाण्यावर चढून जात आरोपींशी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.दंगा नियंत्रक पथकाकरवी पोलिसांनी लाठीचार्ज करत बहुरिया समर्थकांना पांगविले.


जिल्हा पोलीस अधीक्षक बल्लारपुरात दाखल झाले आहेत.  या घटनेने बल्लारपूर सहित चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध तस्करांचे धाबे दणाणले असून. परिस्तिथी नियंत्रणात असल्याचे ठाणेदार भगत यांनी सांगितले.  


सविस्तर वृत्त काही वेळात....