गोंडपिपरितील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड चे वाटप : राष्ट्रवादी काँग्रेस चा पुढाकार #gondpipari - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गोंडपिपरितील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड चे वाटप : राष्ट्रवादी काँग्रेस चा पुढाकार #gondpipari

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल चंद्रपुर यांच्या पुढाकारातून रा.कॉ जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य ,युवक कॉ जिल्हाअध्यक्ष नितीन भटरकर,रा.कॉ सामाजिक न्याय विभाग सेल प्रदेशउपाध्यक्ष सुनील दहेगावकर,राजुरा विधानसभा प्रमुख अरुण निमजे,डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण यांच्या मार्गदर्शनात नुकतंच गोंडपिपरी येथे तहसील कार्यालय,ग्रामिण रुग्णालय,पोलीस स्टेशन,कोविड सेंटर मध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फेस शिल्ड चे वाटप करण्यात आले.


प्रशासनातील महत्वाचा दुवा म्हणजे कर्मचारी.मागील दोन दिवसात २ महत्वाच्या कर्मचाऱ्यांसह 3 जण कोरोना पोसिटीव्ह निघाल्याची माहिती समोर आली.


याची दखल घेत कोरोना महामारी सदृस्य परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता कार्य करणारे पोलीस कर्मचारी,तहसील कार्यालयाचे कर्मचारी,कोविड सेंटर मधील कर्मचारी,ग्रामीण रुग्णालय कर्मचारी नागरिकांना कोरोना महामारीचा बचाव करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करत आहे.सर्व कर्मचाऱ्यांचे सौरक्षण व्हावे या उदात्त हेतूने राष्ट्रवादी कॉंग्रेस गोंडपीपरी च्या वतीने फेस शिल्ड वाटप करण्यात आले. यावेळी रा.यु.कॉ विधानसभा अध्यक्ष कुणाल गायकवाड,काँग्रेस चे तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष सुरज मादुरवार,रा.कॉ माजी तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम वाघ,जेष्ठ कार्यकर्ता अरुण वासलवार,किसान सभा तालुका अध्यक्ष आकाश चौधरी,रा.यु.कॉ शहर अध्यक्ष संदिप ईटेकर,काँग्रेस कार्यकर्ता रोशन ठोंबरे उपस्तीत होते.