कंत्राटी कामगार संगीता पाटील कामावर रुजू असताना मृत्यू चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटना #gmc - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कंत्राटी कामगार संगीता पाटील कामावर रुजू असताना मृत्यू चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटना #gmc

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात वृत्त -
शासकीय रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे होणारे शोषण थांबण्याचे नाव घेत नसून आधी पगार नियमित देण्याकरिता महिलांना आंदोलनाच्या पवित्र्यात रस्त्यावर उतरावे लागले होते त्यातच मनुष्यबळ पुरवठा जुने कंत्राट रद्द करून नव्या कंत्राटाचाही राजकीय वाद सुरु आहे. मात्र कंत्राटी सफाई कामगार दुर्लक्षितच आहेत. 

आज शासकीय रुग्णालयातील कंत्राटी कामगार संगीता पाटील यांच्या कामावर असताना मृत्यू झाला. गत सहा महिन्यापासून पगार नसल्यामुळे आतापर्यंत दोन कामगारांचा मानसिक धक्क्याने मृत्यू झाल्याचा जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांचा आरोप करत मृतदेह उचलू देण्यास कामगारांनीं विरोध केला आहे.  

सध्या जिल्हा रुग्णालयासमोरील परिस्थिती चिघळली असून सर्व कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन पुकारले आहे.  कामगार महिलेच्या पतीचा सहा महिन्यापूर्वी मृत्यू झाला असल्यामुळे तिचा एकमेव मुलगा अनाथ झाला कामगार संतप्त झाले असून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार कंत्राटी कामगारांना सहा महिन्यापासून पगारापासून वंचित ठेवणारे अधिष्ठाता व संचालक वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच सचिव वैद्यकीय शिक्षण विभाग त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.