जीमेल सहित गुगलच्या अनेक सेवांमध्ये अडथळे : जगभर तारांबळ : गुगल ड्राईव्ह, गुगल डॉक्स, गुगल व्हॉईस, गुगल चॅट, गुगल मीट यांसारख्या सेवांना या समस्येचा फटका #gmail #google #googledrive - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जीमेल सहित गुगलच्या अनेक सेवांमध्ये अडथळे : जगभर तारांबळ : गुगल ड्राईव्ह, गुगल डॉक्स, गुगल व्हॉईस, गुगल चॅट, गुगल मीट यांसारख्या सेवांना या समस्येचा फटका #gmail #google #googledrive

Share This
खबरकट्टा / तंत्रज्ञान : 

ई-मेल सेवा देण्याच्या लोकप्रिय जीमेल सह गुगलच्या अनेक महत्त्वाच्या सेवा वापरताना गुरुवारी सकाळपासून तांत्रिक अडचणी आल्याने जगभरातील युझर्सची तारांबळ उडाली. भारतात जीमेल सह गुगल ड्राईव्ह, गुगल डॉक्स, गुगल मीट यांसारख्या सेवांना या समस्येचा फटका बसला. 

तासांतच अनेक भागांतील सेवा पूर्ववत करण्यात यश आल्याचे सांगताना, या समस्येचे कारण मात्र गुगलने जाहीर केले नाही. गुगलच्या विविध सेवांची माहिती ठेवणाऱ्या जी-सूट स्टेटस डॅशबोर्डनुसार, गुरुवारी सकाळपासूनच ई-मेलसाठी जीमेल सेवा वापरण्यात जगभरातील युझर्सना अडचणी आल्या. 


गुगल ड्राईव्ह, गुगल डॉक्स, गुगल व्हॉईस, गुगल चॅट आणि मीट सारख्या अन्य गुगल सेवांनाही या समस्येचा फटका बसल्याचे डॅशबोर्डने म्हटले आहे. गुगलच्याच यूट्यूब या लोकप्रिय व्हिडिओ सेवेतही अडथळे येत असल्याचे अनेक युझर्सनी म्हटले आहे.

सकाळपासूनच भारतासह अनेक देशांतील युजर्सनी जीमेल वापरण्यात अडचणी आल्याची तक्रार नोंदविली. यात लॉग इन करताना तसेच ई-मेलमध्ये फाईल अटॅच करतानाही वारंवार अडचणी आल्या. याशिवाय ई-मेलद्वारे संदेश पाठविणे तसेच मिळण्यास उशीर होऊ लागल्यानेही अनेक युझर्सची गैरसोय झाली. 

दैनंदिन आयुष्यात अत्यंत गरजेचे बनलेल्या या ई-मेल सेवेत अचानक आलेल्या या समस्येने जगभरात अनेकांची तारांबळ उडाली. यासोबतच गुगलच्या अन्य महत्त्वाच्या सेवा वापरतानाही समस्या आल्याने युझर्सची गैरसोय झाली. सोशल मीडियावरही युझर्सने गुगल सेवांमधील या तांत्रिक समस्येबाबत चिंता व्यक्त केली. ट्विटरवरही 'हॅशटॅग जीमेल' टॉप ट्रेडिंग होते.