आदर्श ग्राम घाटकुळ प्रतिकृतीला प्रथम पुरस्कार तान्हा पोळा स्पर्धा : गडचांदूरच्या बालगोपालांनी साकारला कलाकृतीतून आदर्श गाव #ghatkul - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आदर्श ग्राम घाटकुळ प्रतिकृतीला प्रथम पुरस्कार तान्हा पोळा स्पर्धा : गडचांदूरच्या बालगोपालांनी साकारला कलाकृतीतून आदर्श गाव #ghatkul

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : पोंभुर्णा : 


राज्यात आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त, हरित व स्वच्छ ग्राम व स्मार्ट ग्राम म्हणून ओळख असलेल्या पोंभूर्णा तालुक्यातील घाटकुळ या गावाची प्रतिकृती गडचांदुरातील बालगोपालांनी कलाकृतीतून साकारली. गडचांदूर येथे आयोजित तान्हा पोळा स्पर्धेत सदर प्रतिकृतीला प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. याच प्रतिकृतीला चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय तान्हा पोळा स्पर्धेत तृतीय पारितोषिक मिळाले.गडचांदूर येथे दरवर्षी तान्हा पोळा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यंदा राज्यात कोरोनाचे संकट असल्याने गडचांदूर तान्हा पोळा उत्सव समितीतर्फे ऑनलाइन तान्हा पोळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात शहरातील बालगोपाळांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. 


युग सचिन झाडे यांनी तान्हा पोळा स्पर्धेत नंदीबैल सजवून आदर्शगाव घाटकुळची प्रतिकृती मांडली. चिन्मय गोरे, अनघा झाडे, आभा जोगी, फाल्गुनी काकडे, कृष्णा काकडे यांनी घाटकुळ गावातील संस्कृतीचे दर्शन कलात्मकतेने घडवले. स्वच्छता, आरोग्य व कोरोना जनजागृतीचे संदेश दिले. या प्रतिकृतीसाठी मयूर एकरे यांनी मार्गदर्शन केले. गडचांदूर येथील स्पर्धेत द्वितीय पारितोषिक देवांश रेवनाथ एकरे, तृतीय अनन्या गणेश कोल्हे, चतुर्थ चिन्मय संतोष गोरे, स्पर्शिका नगराळे यांनी पटकावले. विजेत्या स्पर्धकांना सायकल, कॅरम, स्कुलबॅग, शिल्ड व रोख पारितोषिके नगराध्यक्षा सविता टेकाम, उपनगराध्यक्ष शरद जोगी, मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी, ठाणेदार गोपाल भारती यांच्या हस्ते देवून सन्मान करण्यात आला. यावेळी रमेश काकडे, हंसराज चौधरी, रऊफ खान वजीर खान, सचिन भोयर, पापय्या पोन्नमवार, सतीश उपलेंचवार, शरद बेलोरकर, मीनाक्षी एकरे, अशोक डोईफोडे, मनोज भोजेकर, रोहन काकडे, रोहीत शिंगाडे, उद्धव पुरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 


आदर्श ग्रामची प्रतिकृती स्पर्धेत साकारल्याबद्दल घाटकुळ येथील सरपंच प्रीती निलेश मेदाळे, उपसरपंच गंगाधर गद्देकार, ग्रामसेवक ममता बक्षी, पदाधिकारी व गावक-यांनी आनंद व्यक्त केला.