नवीन कपड्याच्या दुकानाला आग : दुकानाचा शुभारंभ करून झाला होता फक्त आठवडा : लाखोंचे साहित्य व कपडा माल जळून खाक #garments shop on fire - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नवीन कपड्याच्या दुकानाला आग : दुकानाचा शुभारंभ करून झाला होता फक्त आठवडा : लाखोंचे साहित्य व कपडा माल जळून खाक #garments shop on fire

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सावली -

कपड्याच्या नवीन दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना मध्यारात्रीच्या सुमारास नुकतीच घडली.शुभम रामटेके रा. सावली असे दुकान मालकाचे नाव असून मागील आठवड्यात नुकतेच रेडिमेड दुकानाचा शुभारंभ थाटात करण्यात आला. 


दुकानाला सुरुवात होऊन आठवडा न लोटता रविवारी मध्यरात्री अचानक दुकानाला आग लागली.लोकांकडून आगीची माहिती कळताच दुकान मालकानी आपल्या मित्राच्या मदतीने आग विझविण्यात आली. तोपर्यंत कपडे काऊंटर असे साहित्य जळून लाखोंचे नुकसान झाले.


वडिलांच्या मृत्यू पश्चात कुटुंबाचा प्रपंच योग्य चालावा म्हणून शुभम चार ते पाच लक्ष रुपये खर्च करून महाकाल रेडीमेड कपड्याचे दुकान सुरू केले. सावली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली आहे.